22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeक्रीडाटीम इंडियाने मालिका १-० ने जिंकली

टीम इंडियाने मालिका १-० ने जिंकली

एकमत ऑनलाईन

नेपियर : भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी-२० सामना पावसामुळे रद्द झाला आहे. १६१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पावसाचा व्यत्यय येण्यापूर्वी भारताने ९ षटकांत ४ गडी गमावून ७५ धावा केल्या होत्या. त्यावेळी डीएलएस पार स्कोअर ७५ धावा होता, त्यामुळे सामना टाय झाला आहे.

भारत या धावसंख्येने एक धावही मागे राहिला असता तर न्यूझीलंडला या सामन्यात विजयी घोषित केले असते. भारताने ही तीन सामन्यांची टी-२० मालिका १-० अशी जिंकली.

पहिला सामना पावसाने पूर्णपणे वाहून गेला होता. तेव्हा नाणेफेकही होऊ शकली नाही. त्याचवेळी टीम इंडियाने दुसरा सामना ६५ धावांनी जिंकला. तिसरी टी-२० बरोबरी झाली. न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर टीम इंडियाचा हा सलग दुसरा टी २० मालिका विजय आहे. यापूर्वी २०२० मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने घरच्या मैदानावर टी-२० मालिकेत किवी संघाचा ५-० असा पराभव केला होता.

तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताची फलंदाजी थोडी कमकुवत दिसत होती. न्यूझीलंडसमोर १६१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ७५ धावांत ४ महत्त्वाचे विकेट गमावले. ऋषभ पंत ११ धावा आणि ईशान किशन तंबूत परतला. सूर्यकुमारलाही केवळ १३ धावा करता आल्या.

यजमान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र सुरुवात चांगली झाली नाही. अ‍ॅलन फिनला अर्शदीप सिंगने ३ धावांवर माघारी पाठवले, त्याने मोहम्मद सिराजने मार्क चॅपमनला १२ धावांवर बाद करून संघाला सुरुवातीचे यश मिळवून दिले. ग्लेन फिलिप्स आणि डेव्हन कॉनवे या जोडीने संघाला सांभाळले आणि धावसंख्या १४६ धावांपर्यंत नेली. दोन्ही फलंदाजांनी अर्धशतके झळकावले एका क्षणी न्यूझीलंड १८०-१९० पर्यंत सहज पोहोचेल असे वाटत होते, परंतु शेवटच्या चार षटकांत भारताने जोरदार पुनरागमन करत यजमानांच्या ८ विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडकडून डेव्हन कॉनवेने ५९ आणि ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक ५४ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय एकाही किवी फलंदाजाला १५ धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. सिराज आणि अर्शदीप या दोघांनी ४-४ विकेट घेतल्या.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या