29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeक्रीडाटीम इंडियाची विजयादशमी

टीम इंडियाची विजयादशमी

एकमत ऑनलाईन

भारताचा २-१ ने मालिका विजय, विराट, सूर्या तळपले
हैदराबाद : आशिया चषकातील पराभवानंतर भारतीय संघ जोरदार ट्रोल झाला. मात्र, त्यानंतर बलाढ्य ऑस्ट्रेलियावर आजच्या तिस-या सामन्यात भारताने दणदणीत विजय साकारला. या विजयासह भारताने मालिकाही २-१ ने जिंकली.

ऑस्ट्रेलियाने भारतापुढे विजयासाठी १८७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांच्या रुपात दोन धक्के बसले. पण त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांनी धडाकेबाज फटकेबाजी केली. त्यामुळे भारताला या सामन्यात ६ विकेट राखून विजय मिळवता आला. सूर्याने यावेळी ६९ धावा केल्या, तर कोहलीने ६३ धावांची खेळी साकारली.
ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना भारताला पहिल्याच षटकात धक्का बसला. पहिल्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर लोकेश राहुल बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माही आज मोठी खेळी साकारू शकला नाही. तो १७ धावांवर आऊट झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला आणि त्याने सामन्याचे चित्रच बदलून टाकले. विराट कोहलीनंतर येऊनही त्याने धडाकेबाज फटकेबाजी करत कोहलीच्या आधीच अर्धशतक झळकावले. सूर्या आता मोठी खेळी साकारेल, असे वाटत होते. पण मोठा फटका मारताना तो बाद झाला. सूर्याने ३६ चेंडूंत ५ चौकार आणि ५ षटकारांच्या जोरावर ६९ धावांची दमदार खेळी साकारली.

सूर्यकुमार बाद झाल्यावर कोहलीनेही अर्धशतक झळकावले आणि संघाला विजयाच्या जवळ घेऊन गेला. त्याच्या साथीला हार्दिक पांड्या आला होता आणि त्याने कोहलीला चांगली साथ दिली. सूर्या बाद झाल्यावर कोहली अधिक जबाबदारीने खेळला. कोहली संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब कसे होईल, याचा विचार करत होता. सेट झाल्यावर त्याच्या बॅटमधून चांगले फटके निघत होते. मात्र, ऐनवेळी जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात कोहली बाद झाला. त्यानंतर दिनेश कार्तिक मैदानात उतरला. तो षटकार मारून विजय मिळवून देईल, असे वाटत होते. मात्र, दोघांनी एक-एक सिंगल काढल्यानंतर अखेर शेवटच्या षटकातील ५ व्या चेंडूवर चौकार मारत पांड्याने विजय साकारला.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने धडाकेबाज सुरुवात केली असली तरी अक्षर पटेलने यावेळी अचूक आणि भेदक मारा केला. आपल्या फिरकीच्या तालावर त्याने कांगारूंना चांगलेच नाचवले. त्यामुळे भारताला यावेळी ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येवर खीळ बसवता आली आणि त्याचवेळी भारताने विजयाचा पाया रचल्याचे पाहायला मिळाले.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या