नवी दिल्ली : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला होता. गेल्या काही दिवसांपासून सीमारेषेवरुन या दोन्ही देशांमध्ये तणाव पहायला मिळत होता. अखेर दोन्ही देशांनी याप्रकरणी माघार घेतली आहे.
पूर्व लडाखच्या गलवान भागातून चिनी सैन्य अडीच किलोमीटर मागे सरकलं आहे, तसेच त्यांनी आपली वाहनं देखील मागे घेतली आहेत. त्यानंतर भारतानं देखील आपलं सैन्य माघारी घेतलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भात ट्विट केलं आहे.
Read More जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा : कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही
सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर रविवारी दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. यामध्ये सुसंवाद घडल्याची माहिती समोर आली होती. परस्पर सहमतीनं दोन्ही देशांनी यावर तोडगा काढल्याचं बोललं जातंय.
सोमवारी रात्रीपासून सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू झाली, मंगळवारी पहाटेपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. चीननं सैन्य हटवल्यानं भारतानं देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि आपल्या सैन्याला माघारी बोलावलं आहे.