26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeराष्ट्रीयसिद्धू आणि मुख्यमंत्री चन्नींमध्ये तणाव

सिद्धू आणि मुख्यमंत्री चन्नींमध्ये तणाव

एकमत ऑनलाईन

चंदीगड : नवज्योतसिंग सिद्धूशी वाद विकोपाला गेल्यानंतर कॅप्टन अमरींदर सिंग यांनी काँग्रेस सोडली. मात्र अद्यापही पंजाब काँग्रेसमधील वाद काही अद्याप संपलेला दिसत नाही. आता मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी आणि सिद्धूमध्ये तणाव निर्माण झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सिद्धू यांनी १३ सूत्रीय एजेंडा असलेली चिठ्ठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवली आहे. त्या चिठ्ठीवरुन रविवारी झालेल्या बैठकीत सिद्धू आणि चन्नी यांच्यात वाद झाला.

चंदीगड येथील गव्हर्नर हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार वाद झाला. यावेळी पंजाब काँग्रेसचे पर्यवेक्षक हरिश चौधरी आणि प्रदेश काँग्रेस समितीचे महासचिव प्रकटसिंग हे ही उपस्थित होते. बैठकीदरम्यान सिद्धू यांनी १३ सूत्रीय एजेंडा पुढे केल्याने मुख्यमंत्री चन्नी नाराज झाले.

मुख्यमंत्र्यांनी दिले सिध्दुंना आवाहन
या नाराजीमुळे त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ केला. चन्नी यांनी सिद्धू यांना आवाहन दिले की त्यांनी दोन महिन्यांसाठी मुख्यमंत्री व्हावे आणि १३ सूत्रीय एजेंड्याची अंमलबजावणी करुन दाखवावी. सूत्रांच्या दाव्यानुसार सिद्धू यांनी मुख्यमंत्री चन्नी यांच्यावर बादल कुटुंबाच्या व्यवसायावर कारवाई करण्याचा दबाव आणत आहेत. याबाबत उल्लेख त्यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या चिठ्ठीत केला होता.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या