34 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home राष्ट्रीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बोलवली महत्वाची बैठक

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बोलवली महत्वाची बैठक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि चीन देशाच्या सीमेवर तणावाचे वातावरण कायम असतानाच चीनने पुन्हा एकदा दगाबाजी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी महत्वाची बैठक बोलवली आहे.

चीनने सीमेवरील पॅन्गाँग भागात घुसखोरीचा प्रयत्न केलाय. परंतु, भारतीय सैनिकांनी चीन सैनिकांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. आता सीमेवर टँकही तैनात केले आहेत. या दरम्यान भारताच्या राजधानी दिल्लीमध्ये देखील हालचालींना वेग आला आहे.

याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत भारत आणि चीन तणावासंबंधी चर्चा केलीय. तसेच उत्तर भारतातील लडाखमधील सद्य परिस्थितीबद्दल माहिती घेतलीय. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हेही याच मुद्यावर आणखी एक बैठक बोलावणार आहे, असे समजत आहे. या बैठकीमध्ये वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये सेनेच्या वरीष्ठ अधिकार्‍यांसोबत गुप्तचर यंत्रणेचे प्रमुखही हजर आहेत. इंटेलिजेन्स ब्युरोचे संचालक अरविंद कुमार तसेच सचिव सामंत गोयल यांनी येत्या महिन्यांत चीन देशाकडून काय पावले उचलली जाऊ शकतात?, यावर आपले म्हणणं मांडलंय. या बैठकीत केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला हेही उपस्थित होते.

यातील उल्लेखनीय म्हणजे, 29 – 30 च्या रात्री चीन देशाकडून पुन्हा एकदा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, भारतीय जवानांनी मात्र चीनेच्या सैनिकांचा हा घुसगोरीचा प्रयत्न हाणून पाडलाय. याबद्दल अधिकृतरित्याही माहिती दिली होती. त्यानंतर चीन देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील दोन्ही देशांच्या सेनेची चर्चा सुरू केली आहे, असे म्हटलं होते. परंतु, चीन देशाकडून घुसखोरी केल्याचा दावा मात्र त्यांनी फेटाळून लावला होता.

भारतातील लडाख भागातील तणाव कमी करण्यात याअगोदरही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. त्यानंतर 6 जुलै रोजी दोन्ही पक्षांकडून सेना मागे हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असे म्हटलं गेलं होतं.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या