36.1 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeमहाराष्ट्रसीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग

सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग

एकमत ऑनलाईन

पुणे : कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लसीमुळे सध्या चर्चेत असणा-या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग लागली आहे. सीरम इन्स्टिट्यूटमधील एका इमारतीच्या तिस-या मजल्यावर ही आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारीदेखील घटनास्थळी रवाना झाले आहेत.

कोव्हिशिल्ड लसीच्या वापरासाठी परवानगी देण्यात आलेली असून सध्या देशभरात लसीकरणास सुरु आहे. मांजरी येथील या ठिकाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घेतली जाणारी बीसीजी लस तयार केली जाते. त्या विभागाला ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. महत्वाचे म्हणजे कोरोनावरील कोव्हिशिल्ड लस तयार केली जाते तेथून हा भाग काही अंतरावर आहे. सुदैवाने अद्याप आगीची झळ तिथपर्यंत पोहोचलेली नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून मोठ्या प्रमाणात आगीचे लोट दिसत आहेत. यामुळे घटनास्थळी लोकांनी गर्दी केली आहे.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टिट्यूटच्या एका इमारतीला आग लागली आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि प्रमुख अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवत असून इमारतीत कोणते कर्मचारी अडकले आहेत का? याचीही पाहणी करत आहेत. दरम्यान आजुबाजूला लोकवस्ती असल्याने आगीची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली आहे. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीदेखील झाली असून, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 

दोन्ही लस सुरक्षित – आरोग्य मंत्री राजेश टोपे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
167FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या