24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रवर्ध्यात ट्रकचा भीषण अपघात, चालकाचा मृत्यू, रस्त्यावर कोंबड्यांचा खच

वर्ध्यात ट्रकचा भीषण अपघात, चालकाचा मृत्यू, रस्त्यावर कोंबड्यांचा खच

एकमत ऑनलाईन

वर्धा : वर्धा-नागपूर हायवेवर कान्हापुरजवळ सकाळीच भीषण अपघात झाला. वर्धेवरून कोंबड्या घेऊन नागपूरला जात असलेल्या ट्रकला सोयाबीन घेऊन राजनांदगाव छत्तीसगड येथे जात असलेल्या भरधाव ट्रकने मागून जबर धडक दिली. यात धडक देणा-या ट्रकचा चालक जागीच ठार झाला आहे, तर तीन किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती आहे. या अपघातात दोन्ही वाहन रस्त्याकडेला पलटी झाले असून शेकडो कोंबड्याही ठार झाल्या आहेत. परिसरातील नागरिकांनी हा थरार बघण्यासाठी गर्दी केली होती. ही घटना आज १८ मे (बुधवारी) नागपूर वर्धा महामार्गावर ६ वाजताच्या सुमारास घडली. रवी रामनाथ सहारे (वय ३२) रा. वाई रुई जिल्हा यवतमाळ असे मृतकाचे नाव आहे.

ट्रकचा समोरील भागाचा चुराडा
अशोक लेलँड ट्रक हा वर्धा येथून कोंबड्या भरून नागपूरला जात होता, तर मागून येणारा ट्रक हा वाशीम येथून सोयाबीनचे पोते भरून राजनांदगाव छत्तीसगड येथे भरधाव जात होता. त्या दरम्यान सेलू नजीकच्या कान्हापुरजवळ कोंबड्या असलेल्या ट्रकला सोयाबीन घेऊन जाणा-या ट्रकने मागून जबरदस्त धडक दिली. वाहन पलटी होऊन चुराडा झाल्याने धडक देणा-या ट्रकचा चालक रवी रामनाथ सहारे (वय ३२) जागीच ठार झाला तर त्याचा वाहक शेख वकील वय ४५जखमी झाला. कोंबड्या असलेल्या ट्रकमधील चालक लोकनाथ श्रीवास (वय ३६) व वाहक किरण वर्मा (वय ३६) किरकोळ जखमी झाले.

शेकडो कोंबड्या ठार
हा अपघात एवढा भीषण होता की धडक मारणा-या ट्रकचा समोरील भागाचा चुराडा होऊन रोडच्या बाजूला जाऊन पलटी झाला. यात ट्रकमधील धान्याचे पोते खाली परसले.. कोंबड्या असलेल्या ट्रकच्या मागील भागाचे मोठे नुकसान झाले असून शेकडो कोंबड्या ठार झाल्या आहेत. अपघाताची माहीती सेलू पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक गजानन कंगाले व वणवे यांनी घटनास्थळी जाऊन उपस्थितांच्या मदतीने मृतकाला बाहेर काढून टोल नाक्यावरील रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या