29 C
Latur
Monday, March 20, 2023
Homeमहाराष्ट्रमुंबईवर पुन्हा दहशतवादाचे सावट?

मुंबईवर पुन्हा दहशतवादाचे सावट?

एकमत ऑनलाईन

मुंबई : चीन, हाँगकाँग, पाकिस्तान येथे प्रशिक्षण घेऊन आलेला हस्तक मुंबईत आल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) मुंबई पोलिसांना कळवण्यात आले आहे. सरफराज मेमन हा संशयित मुंबईत पोहोचल्याची माहिती देण्यात आली आहे. एनआयए या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सावध राहण्याबाबतचा मेल आला असल्याची सूत्रांनी माहिती दिली.

सरफराज हा मध्यप्रदेशच्या इंदोरचा असल्याचे त्यात म्हटले आहे. त्यामुळे मध्यप्रदेश पोलिसांनाही याबाबत कळवण्यात आले आहे. ही व्यक्ती भारतासाठी धोकादायक असून, त्याची ओळख पटावी यासाठी त्याचा चालक परवाना, पारपत्र आधारकार्डची प्रत एनआयएकडून पोलिसांना ईमेलद्वारे पाठवलेली आहे. या संशयित व्यक्तीचा शोध सध्या सर्वत्र सुरू असून, सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.

यापूर्वी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एनआयएला मुंबईवर हल्ल्याबाबत ईमेल मिळाला होता. तपासणीत तो पाकिस्तानातील असल्याचे निष्पन्न झाले. ई-मेलमध्ये सीआयएचा अधिकारी असल्याचे भासवण्यात आले आहे. त्यापूर्वी मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पाकिस्तानातील एका क्रमांकावरून २६/११ सारखा भीषण दहशतवादी हल्ला होणार असल्याचा संदेश आला होता.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या