24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयपुलवामामध्ये दहशतवाद्यांकडून पोलिस कर्मचा-यावर गोळीबार

पुलवामामध्ये दहशतवाद्यांकडून पोलिस कर्मचा-यावर गोळीबार

एकमत ऑनलाईन

पुलवामा : काश्मीरमधील पुलवामा येथील गुडूरा या गावात दहशतवाद्यांनी एका पोलिस कॉन्स्टेबलवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. रियाझ अहमद ठोकर असे त्या पोलिस कर्मचा-याचे नाव आहे. हल्ल्यानंतर रियाझ यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

दहशतवाद्यांचा शोध सुरू
दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असल्याची माहिती काश्मीर पोलिसांनी दिली. दहशतवाद्यांचा शोध सुरु असून अद्याप त्यांना पकडण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले नाही. दहशतवाद्यांनी रियाझ यांच्यावर जवळून गोळीबार केला. यात ते गंभीर झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या