36.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeराष्ट्रीयदहशतवादी रिंदासाठी काम करतात भारतात २७ स्लिपर सेल

दहशतवादी रिंदासाठी काम करतात भारतात २७ स्लिपर सेल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताचा मोस्ट वाँटेड खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग रिंदाबाबत गुप्तचर विभागाचा मोठा खुलासा केला आहे. रिंदा त्याची ओळख लपवण्यासाठी नेहमी वेशांतर करत असतो. एवढेच नव्हे तर, त्याने आतापर्यंत ६ वेळा वेगवेगळ्या प्रकारे वेशांतर केले आहे, अशी माहिती एजन्सीच्या तपासात समोर आले आहे. रिंदासाठी भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी २७ स्लिपर सेल काम करतात, असादेखील खूलाला करण्यात आला आहे.

रिंदा याने २०२० मध्ये पाकिस्तानी एजन्सी आयएसआयच्या मदतीने भारतातून पळ काढला होता. तेव्हापासून तो स्लीपर सेलच्या मदतीने पंजाब, हरियाणा, हैदराबाद आणि महाराष्ट्रात स्फोटकांचा पुरवठा करत असल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, एजन्सींनी त्याला अ+ स्तरावरील गुंड म्हणून घोषित केले आहे.

हरविंदर सिंग रिंदा याच्यावर आतापर्यंत ३७ गुन्हे दाखल असून, त्यापैकी नांदेडमध्ये १४ आणि पंजाबमध्ये २३ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आतापर्यंत त्याच्या १५ साथीदारांना अटक केली आहे. रिंदावर मकोका, अपहरण आणि खूनाचे गुन्ह्यांसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. सर्वात धक्कादायकबाब म्हणजे रिंदाने त्याच्या खटल्याशी संबंधित महत्त्वाच्या साक्षीदारांचीही हत्या केली आहे.

रिंदासाठी भारतात करतात २७ गुंड काम
गुप्तचर यंत्रणांनी केलेल्या तापसामध्ये खलिस्तानी दहशतवादी रिंदासाठी भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी २७ गुंड काम करतात, अशीदेखील माहिती आतापर्यंतच्या तपासात समोर आली आहे. त्यापैकी एकाचे नाव गुरप्रीत असून त्याला नुकतेच पंजाबमधील करनाल येथील कारवाईदरम्यान अटक करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या