नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरोधात मायदेशात होणा-या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ९ फेब्रुवारी रोजी पहिला कसोटी सामना होणार आहे. या संघ निवडीतीलमधील सर्वात मोठी बाब म्हणजे रविंद्र जाडेजा, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव होय.. ऑस्ट्रेलियाविरोधात होणा-या कसोटी मालिकेसाठी सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांना संधी देण्यात आली आहे. तसेच दुखापतीनंतर रविंद्र जाडेजा संघात पुनरागमन करत आहे.
रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे, तर केएल राहुल उपकर्णधार असेल. त्याशिवाय पंतच्या अनुपस्थितीत केएस भरत याला विकेटकिपर म्हणून स्थान देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात होणा-या कसोटी मालिकेसाठी रविंद्र जाडेजाला संधी देण्यात आली आहे. पण तो फिटनेस टेस्ट पास केली तरच संघाचा भाग असेल, असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे. जसप्रीत बुमराह अद्याप दुखापतीतून सावरला नसल्यामुळे त्याला संघात स्थान दिलेले नाही.
दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद सिराज, उमेश यादव. जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव