25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रटीईटी घोटाळा, २९३ जणांवर कारवाई!

टीईटी घोटाळा, २९३ जणांवर कारवाई!

एकमत ऑनलाईन

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा आदेश, परिपत्रक जारी
मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरण आता कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार आता २९३ जणांवर कारवाई होणार आहे. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. २०१९-२०२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी सायबर स्टेशन पुणे शहर येथे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या परीक्षार्थ्यांवर कायमस्वरूपी बंदी घातली जाऊ शकते.

कारवाईच्या आदेशासंबंधी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. ज्यात हे कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले. या परिपत्रकानुसार या गैरप्रकाराच्या तपासादरम्यान परीक्षार्थीच्या उत्तरपत्रिकांची कसून तपासणी करण्यात आली आहे. ही तपासणी करताना असे निष्पन्न झाले की, ७८८० उमेदवार परीक्षेत गैरप्रकारात सामिल आहेत.

शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ चा अंतिम निकाल २८ ऑगस्ट २०२० रोजी परीक्षा परिषदेच्या स्थळावर प्रसिध्द करण्यात आला होता. त्यानुसार एकूण १६७०५ उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी अनेक उमेदवार गैरप्रकारात समाविष्ट असल्याचे निष्पन्न झाले. २९३ उमेदवारांनी आरोपीसोबत बनावट प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले असल्याचे यात समोर आले, तर उर्वरित ८७ उमेदवार आरोपींच्या संपर्कात होते, असे आढळून आलेले आहे. परिपत्रकात देण्यात आलेल्या माहितीनुसार, परीक्षा पात्र उमेदवारांच्या यादीत अनेक असेही उमेदवार होते, यांची नावे दोव वेळा पात्र उमेदवार म्हणून नोंदवण्यात आली होती. यात ७८८० पैकी ६ उमेदवारांची नावे दोनदा नोंदवण्यात आली आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या