22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्रशिंदे विरोधात ठाकरे सुनावणीला सुरूवात

शिंदे विरोधात ठाकरे सुनावणीला सुरूवात

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राज्याच्या राजकारणातल्या ऐतिहासिक बंडांपैकी एक असलेल्या एकनाथ शिंदेंच्या बंडाला आता आठवडा पूर्ण होतो आहे. या काळात शिवसेनेचे अनेक आमदार, खासदार, मंत्री शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे आता केवळ आदित्य ठाकरे ठाकरे गटात राहिले आहेत. दरम्यान, शिंदे ठाकरे वाद आता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. दोन्ही गटांनी आपल्यासाठी दिग्गज वकिलांची फौज उभी केली आहे.

उच्च न्यायालयात का गेला नाहीत; न्यायालयाचा सवाल
एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकारविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरूवात झाली आहे. न्यायमूर्तींनी तुम्ही उच्च न्यायालयात का गेला नाही, असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर वकिलांनी सांगितलं की, माझ्याकडे तीन उत्तरे आहेत. २२६ चे अस्तित्व कलम ३२ ला लागू करण्यासाठी घटनात्मक प्रतिबंध नाही. दुसरे कारण, फ्लोअर टेस्ट, अपात्रता यासारख्या कोणत्याही प्रकरणांमध्ये, अधिपतींनी कलम ३२ पास केलं आहे.

उपसभापती अपात्रतेची कारवाई पुढे करू शकत नाहीत जेव्हा त्यांना काढून टाकण्याची मागणी करणारा ठराव प्रलंबित असतो, हे सांगतानाच शिंदे गटाच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अरुणाचल प्रदेशातल्या ‘नबम रेबिया’ निर्णयाचा हवाला दिला.

तसंच तिसरे कारण म्हणजे विधीमंडळातील अल्पसंख्याक राज्ययंत्रणेला उद्ध्वस्त करत आहेत, आमच्या घरांवर हल्ले करत आहेत, आमचे मृतदेह परत येतील असे सांगत आहेत. मुंबईत आमचे हक्क बजावण्यासाठी वातावरण अनुकूल नाही, असंही वकिलांनी म्हटलं आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या