16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeमहाराष्ट्रठाकरे गटाची मशाल रॅली अडवली; कर्नाटक सरकारची दडपशाही

ठाकरे गटाची मशाल रॅली अडवली; कर्नाटक सरकारची दडपशाही

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : सीमाभागात गेल्या ६० वर्षांपासून दडपशाही करणा-या कर्नाटक सरकारने शिवसेना ठाकरे गटाची बेळगावच्या दिशेने रवाना झालेली मशाल रॅली कोगनोळीजवळ अडवली आहे. कर्नाटक सरकारची दडपशाही गृहित धरून कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने रॅली नेण्याचा निर्धार केला आहे.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ देण्यासाठी कार्यकर्त्यांकडून ‘दिवस वेदनांचा, दौड मशालीची’ या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगाव येथे १ नोव्हेंबरला काळा दिन’ पाळला जातो.
मशाल रॅली अडवण्यात आल्यानंतर बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, शिवाजी महाराज की जय म्हणत ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. रॅली अडवण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी महामार्गावरच ठिय्या मारला.

यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले की, हे एक दडपशाहीचे उदाहरण आहे. देशात हुकूमशाही, दडपशाही सुरु आहे त्याचेच हे प्रतीक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेकरांनी लोकशाहीत दिलेल्या अधिकारावर घाला घालण्याचे काम कर्नाटक करत असल्याचा आरोपही संजय पवार यांनी केला. आम्ही मशाल पेटवली आहे, मराठी बांधवाना ताकद देण्याचे काम करत असताना हे दादागिरी करत आहेत.

यांनी आज अडवलं असले तरी उद्या मशाल आणि भगवा झेंडा बेळगावात पोहोचेल, असा निर्धार संजय पवार यांनी व्यक्त केला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ देण्यासाठी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी ‘दिवस वेदनांचा, दौड मशालीची’ या रॅलीचे आयोजन केले आहे. बेळगाव येथे १ नोव्हेंबरला काळा दिन’ पाळला जातो. रॅलीत सुमारे हजारो लोक सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांनी दिली आहे.

पोलिसांकडून तगडा बंदोबस्त
कर्नाटक सरकारची सीमाभागातील दडपशाही नवीन नाही. आजह्याशाल रॅली येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांकडून कोगनोळी टोलनाक्यावर तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रॅलीने बेळगावमध्ये प्रवेश करू नये, यासाठी हा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शाहू समाधीस्थळापासून मशाल रॅलीला सुरुवात करण्यात आली. धगधगती मशाल आणि भगवा झेंडा घेवून काळ्या पट्ट्या बांधून रॅली बेळगावच्या दिशेने रवाना झाली होती. कोल्हापुरातून ही रॅली निघणार कागल, कोगनोळी, निपाणी, संकेश्वर, हत्तरगीमार्गे बेळगावमध्ये पोहोचण्याचे नियोजन आहे. रॅलीत ठिकठिकाणी कार्यकर्तें सहभागी होणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या