23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमहाराष्ट्रठाकरे कुटुंबाबद्दल कधीच चुकीचे भाष्य करणार नाही

ठाकरे कुटुंबाबद्दल कधीच चुकीचे भाष्य करणार नाही

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : आम्हा खासदारांना उद्धव ठाकरे यांना सोडायचे नव्हते. ठाकरे कुटुंबाबद्दल कधीच चुकीचे भाष्य करणार नाही असे विधान खासदार धैर्यशील माने यांनी केले आहे. माझ्या हातात आजही उद्धव ठाकरे यांनीच बांधलेले शिवबंधन आहे.

त्यामुळे उद्धव ठाकरे असो किंवा आदित्य ठाकरे असो किंवा ठाकरे कुटुंबाविरोधात मी कधीही चुकीचे भाष्य करणार नाही. त्यांच्यावर टीका करणार नाही. ठाकरे घराण्याचा आम्हाला नेहमीच आदर राहील, असे धैर्यशील माने यांनी स्पष्ट केले. हे सांगताना धैर्यशील माने यांचे डोळे पाणावले होते.

दरम्यान शिरसाट यांच्या ट्विटनंतर आता धैर्यशील माने यांनी उद्धव ठाकरेंबाबत थेट भाष्य केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. आमचे पाऊल उद्धव ठाकरे यांच्या विरोधात नाही, आघाडी विरोधात आहे. आजही माझ्या हातातले शिवबंधन उद्धव ठाकरे यांनी बांधलेले आहे.

माझ्याकडून ठाकरे कुटुंबा बाबत कधीच चुकीचे वाक्य येणार नाही. ठाकरे कुटुंबाला दृष्ट लागू नये हाच आमचा प्रयत्न होता. आमचा लढा सर्व सामान्य शिवसैनिकांसाठीच आहे. ठाकरे कुटुंबियांशी माझा जिव्हाळा कायम कायम असेल, असं धैर्यशील माने यांनी सांगितले आहे.

अनैसर्गिक आघाडीला सोडायचे होते
कोल्हापूर जिल्ह्याला वैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्य आणि केंद्र एकाच विचारांचे हवेत. आम्हा खासदारांना उद्धव ठाकरे यांना सोडायचे नव्हते.. आम्ही सगळे त्यांना जाऊन भेटलो. त्यांना आमच्या समस्या सांगितल्या. राजकीय परिस्थितीही त्यांच्या लक्षात आणून दिली. पण राज्यात जी आघाडी झाली होती ती अनैसर्गिक होती, असे ही धैर्यशील माने म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या