मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असून याचा निकाल काय लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यादरम्यान आता ठाकरे गटाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. कारण मशाल चिन्ह परत मिळावे यासाठी आता समता पार्टीने सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.
विशेष म्हणजे अगदी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची समता पार्टीच्या नेत्यांनी भेट घेतली होती. ही भेट घेतल्यानंतर समता पार्टीच्या नेत्यांकडून सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे गटाला दिलेल्या चिन्हाबद्दल याचिका दाखल करण्यात येत आहे.
निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात दिले आहे. पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी ‘मशाल’ हेच चिन्ह ठाकरे गटाला वापरावे लागणार आहे. त्यानंतर समता पार्टीने याबद्दलची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे.