31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeराष्ट्रीयतो शब्द अपमानजनक नाही - कमलनाथ यांची स्पष्टोक्ती

तो शब्द अपमानजनक नाही – कमलनाथ यांची स्पष्टोक्ती

एकमत ऑनलाईन

इंदूर : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी इमरती देवी यांचा उल्लेख आयटम असा केल्यानंतर या वक्तव्याचा निषेध करत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहे. यानंतर कमलनाथ यांनी आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना कमलनाथ म्हणाले की, जेव्हा लोकसभेत यादी येते तेव्हा त्यावर आयटम नंबर-१ . विधानसभेत ही यादी आल्यावर देखील आयटम नंबर-१ असे लिहिलेले असते. आयटम हे मी कोणत्या दुर्भावनेनेकिंवा अपमान करण्याच्या दृष्टीने म्हटलेले नाही. आयटम हा काही अपमानजनक शब्द नाही. मला त्यावेळी त्यांचे नाव आठवत नव्हते.

म्हणून मी म्हटले की त्या येथील आयटम आहेत. आयटम शब्दाचा वापर हा सर्वसामान्यपणे केला जात असतो. हा शब्द विधानसभेत देखील येतो. तुम्ही एखादा कार्यक्रम पाहता, म्हणता आज माझा आयटम नंबर वन ओमकारेश्वर आहे. तर मग हे काय अपमानजनक झाले का?. मी असे समजत नाही, पण त्यांना आता सांगण्यासारखे काही नाही. कोणत्या ना कोणत्या बहाण्याने आपल्याकडे लक्ष वेधून घ्यावे यासाठी ते उपोषणाला आहेत. हे त्यांचे एकच लक्ष्य आहे, असेही कमलनाथ म्हणाले.

मलबार युध्दसरावात ऑस्ट्रेलियाचा समावेश निश्चित

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या