22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeउद्धव ठाकरेंसोबत असणा-या १६ आमदारांना आमचेच ऐकावे लागेल

उद्धव ठाकरेंसोबत असणा-या १६ आमदारांना आमचेच ऐकावे लागेल

एकमत ऑनलाईन

पणजी : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा देताना उद्धव ठाकरेंनी अत्यंत भावनिक भाषण केले. बंडखोरांना फटकारेही लगावले. त्यानंतर आज शिंदे गटाकडून सविस्तर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी मीडियाशी संवाद साधताना मीडियाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. आम्हाला उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आदर आहे.

त्यामुळेच आम्ही त्यांचा राजीनामा मागायला गेलो नाही. आम्हाला त्यांचा राजीनामा नको होता. तर भाजपसोबतची नैसर्गिक युती हवी होती, असे दीपक केसरकर यांनी सांगितले. तसेच ज्या १६ आमदारांवर निलंबनाची टांगती तलवार आहे, त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार नाही. ते आमदार आमच्यासोबतच राहतील. उलट शिवसेनेच्या आमदारांनाच आमचं ऐकावं लागेल, असा दावा दीपक केसरकर यांनी केला.

आम्ही आमच्या पक्षाची नोंदणी विधान भवनात केली आहे. त्यामुळे आमचा गट हा विधिमंडळात शिवसेना म्हणूनच राहणार आहे. आम्ही शिवसेनेवर दावा केला नाही. कोणत्याही पक्षावर दावा करण्यासाठी निवडणूक आयोगाची प्रक्रिया असते. त्यामुळे बाहेर आम्ही शिवसेनेवर दावा केला नाही.

पण सभागृहात आमचा गट शिवसेना म्हणून असेल. बहुसंख्य आमदार जेव्हा आपला नेता निवडतात तेव्हा त्यांच्यासोबत राहावं लागतं. १६ आमदार आपला नेता बदलू शकत नाहीत. पक्षांतर बंदी कायदा हा सभागृहात लागू होतो. तुम्ही कशी कामगिरी करतात, व्हीप पाळला गेला नाही, नियम सभागृहात मोडले, तरच कारवाई होते, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.

शब्द फिरवता येत नाही
शेवटची मुदत दिल्यानंतर आम्ही पुढचे निर्णय घेतले. तुम्ही जेव्हा एखाद्या मोठ्या पक्षाला शब्द देता तेव्हा त्या शब्दावरून माघार घेता येत नाही. आम्ही एकनाथ शिंदे यांना सांगितले की, हा शेवटचा दिवस आहे. तुम्ही शब्द द्या. मग आता माघार नाही. हा वाद तत्त्वांचा वाद आहे. आताची युती बरोबर नाही. राज्याच्या जनतेने ज्यांना निवडून दिले, त्यांच्याशीच युती झालेली आहे. तुम्ही स्वत: शिवसेनेत आणि निम्मं काम राष्ट्रवादीचं करता, तेव्हा तुम्ही जनतेच्या पाठीत खंजीर खुपसता. निवडून देणारी जनता असते, पक्ष नसतो, असेही त्यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या