22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeक्रीडाद. आफ्रिकेचा सलग दुसरा विजय

द. आफ्रिकेचा सलग दुसरा विजय

एकमत ऑनलाईन

भारताच्या पदरी निराशाच
कटक : हेनरिक क्लासेनच्या वादळी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारताचा ४ विकेट्सने पराभव केला. द. आफ्रिकेला सुरुवातीला एकानंतर एक धक्के बसले. परंतु त्यानंतर हेनरिक क्लासेनने तुफानी फलंदाजी करत भारताच्या आशेवर पाणी सोडले. त्याने अवघ्या १२ चेंडूत ५८ धावा कुटत विजय सुकर केला. या विजयाने ५ सामन्यांच्या मालिकेत भारताला सलग दुसरा धक्का बसला.

भारताने प्रथम फलंदाजी करीत दिलेल्या १४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात खराब झाली. भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने दक्षिण आफ्रिकेच्या टॉपच्या तीन फलंदाजाला माघारी धाडून सामना टीम इंडियाच्या बाजूने झुकवला. परंतु त्यानंतर मैदानात आलेल्या हेनरिक क्लासेनने तुफानी फलंदाजी करत भारताच्या आशेवर पाणी फेरले. त्याने अवघ्या १२ चेंडूत ५८ धावा कुटल्या. याच्या जोरावरच द. आफ्रिकेने १९ व्या षटकात विजयावर शिक्कामोर्तब केले.

प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसोबतच्या दुस-या टी-२० सामन्यात भारताने आफ्रिकेपुढे १४९ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताच्या डावाची सुरुवात रडतखडत झाली होती. या सामन्यात भारताच्या ३ खेळाडूंना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. त्यानंतर अखेरच्या क्षणी दिनेश कार्तिक याने जोरदार फटकेबाजी करीत किमान सन्मानजनक धावसंख्या उभारण्यास मदत केली.

टीम इंडियाला पहिल्याच षटकातच गायकवाडच्या रुपात पहिला झटका बसला. तो अवघ्या एका धावेवर बाद झाला. त्यानंतर ईशान किशन ३४ व ऋषभ पंत ५ धावांवर तंबूत परतले. हार्दिक पांड्याही अवघ्या ९ धावांवर त्रिफळाचित झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर ४० व अक्षर पटेल १० धावांवर बाद झाले. दिनेश कार्तिक व हर्षल पटेलने शेवटच्या षटकात १८ धावा वसूल केल्या. त्यामुळे भारताचा स्कोअर १४८ या समाधानकारक आकड्यापर्यंत पोहोचला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या