18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeआंतरराष्ट्रीय१८ ऑक्टोबरपासून विमानसेवा पूर्ण क्षमतेने

१८ ऑक्टोबरपासून विमानसेवा पूर्ण क्षमतेने

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील कोरोना आता नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. हवाई सेवेवरील उड्डाणांसाठी असलेला कॅपेसिटी कॅप १८ ऑक्टोबरपासून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे १८ ऑक्टोबरपासून पूर्ण प्रवासी क्षणतेने हवाई उड्डाणे होणार आहेत. नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे.

देशातंर्गत व्यावसायिक उड्डाणांसाठी असलेले निर्बंध १८ ऑक्टोबरपासून हटवण्यात येणार आहेत. प्रवासी क्षमतेवर असलेले निर्बंध हटवण्यात येणार असल्याने १८ ऑक्टोबरपासून पूर्ण प्रवासी क्षमतेने हवाई उड्डाणे होणार आहेत. सप्टेंबर महिन्यात देशातंर्गत उड्डाणांसाठी प्रवासी क्षमता ७२.५ टक्क्यांवरून ८५ टक्के करण्यात आली होती. आता हे निर्बंध हटवल्याने पूर्ण प्रवासी क्षमतेने उड्डाणे सुरू होणार आहेत.

कोरोना महामारीमुळे २३ मार्च २०२० पासून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर निर्बंध लावण्यात आले होते. मात्र, मे २०२० पासून वंदे भारत योजनेतंर्गत आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा सुरू होती. तसेच ठराविक देशांसोबत द्विपक्षीय एयर बबल व्यवस्थेनुसार जुलै २०२० पासून हवाई उड्डाणे सुरू करण्यात आली होती.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या