नवी दिल्ली: तामिळनाडूत पुढच्या वर्षाच्या सुरवातीला विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपसोबत अण्णाद्रमुकची युती कायम राहील, अशी घोषणा मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी शनिवारी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या चेन्नई ही घोषणा करताना आमची युती २०२१ च्या निवडणुका जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात तामिळनाडू सरकारने केलेल्या उपाययोजनांचे अमित शहांनी यावेळी कौतुक केले. तसेच केंद्राच्या क्रमवारीनुसार यावर्षी देशातील इतर राज्यांच्या तुलनेत तामिळनाडूमधील सरकार हे सर्वात चांगले आहे, असे गौरवोद्गारही काढले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारताने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला आहे. तामिळनाडूत मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पन्नेरसेल्वम यांनीही चांगले काम केल्याचा उल्लेख शहांनी केला.
अण्णाद्रमुककडून विजयाच्या हॅट्रीकची तयारी
तामिळनाडूत ९ वर्षांहून अधिक काळापासून अण्णाद्रमुकची सत्ता आहे. लोकसभा निवडणुकीत द्रमुकने अण्णाद्रमुकला झटका दिला होता. आता विधानसभा निवडणुकीतही द्रमुककडून त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी अण्णाद्रमुकने तयारी सुरू केली आहे.२०११ च्या विधानसभा निवडणुकीत अण्णाद्रमुकने दिवंगत मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या नेतृत्वाखाली द्रमुकचा पराभव केला होता. वर्ष २०१६ मधील विधानसभा निवडणुकीतही त्याचीच पुनरावृत्ती झाली होती.
हदगाव नगरपरिषदला कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्यात यावा