23.2 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयसत्तेची भूक खूपच धोकादायक

सत्तेची भूक खूपच धोकादायक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीनंतर एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतली. यावर आता राष्ट्रपतिपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

यशवंत सिन्हा काल रायपूरमध्ये दाखल झाले होते. इथं त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे वर्णन ‘सत्तेची धोकादायक भूक’असे केले आहे. एवढेच नाही तर सिन्हांनी भारतीय जनता पक्षावरही जोरदार हल्लाबोल केला आहे. सिन्हा म्हणाले, ‘आज देशभर अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. एक विचारधारा आहे, जी लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम करत आहे आणि सरकार स्वत: त्याचा प्रचार करत आहे.’

राष्ट्रपतिपदाचे उमेदवार सिन्हांनी रायपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रात काय झाले ते तुम्ही पाहिले आहे. त्यामुळे आपल्या लोकशाहीचे महत्त्व वाढले आहे का? असा सवाल त्यांनी केला. केंद्र सरकारवर टीका करताना सिन्हा म्हणाले, केंद्र सरकार एकात्मतेच्या राजकारणावर विश्वास ठेवत नाही, तर संघर्षाचे राजकारण करत आहे.
सिन्हा यांनी देशातील जातीय हिंसाचाराच्या अलीकडच्या घटनांवरही सविस्तर भाष्य केले.

आज देशभर अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. एक विचारधारा आहे, जी लोकांमध्ये फूट पाडण्याचं काम करत आहे आणि सरकार स्वत: त्याचा प्रचार करताना दिसत आहे. राष्ट्रपतींना अधिकार आहे, ते सरकारला सल्ला देऊ शकतात. पण, ते पंतप्रधानांचे बाहुले आहेत, त्यामुळे ते काही करू शकत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.

देशाला मूक राष्ट्रपतींची गरज नाही, तर आपली घटनात्मक जबाबदारी पार पाडणा-या राष्ट्रपतींची गरज आहे. राष्ट्रपती कार्यालय हे अत्यंत प्रतिष्ठेचे कार्यालय आहे. राष्ट्रपतिपद हे सन्माननीय पद आहे. राज्यघटनेनुसार राष्ट्रपतींची काही कर्तव्ये आहेत, ती पार पाडलीच पाहिजेत. आपण इतिहासात पाहिलं आहे की काही राष्ट्रपतींनी पदाचा आदर केला तर काहींनी मौन बाळगले, असा घणाघातही त्यांनी केंद्रावर केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या