22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeऑस्ट्रेलियन खेळाडू प्रेक्षकांच्या दिशेने थुंकला

ऑस्ट्रेलियन खेळाडू प्रेक्षकांच्या दिशेने थुंकला

एकमत ऑनलाईन

लंडन : ऑस्ट्रेलियाचा टेनिसपटू निक किर्गियोसने विंबल्डनच्या पहिल्याच फेरीत वादग्रस्त वर्तन केले. यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने ब्रिटनचा टेनिसपटू पॉल जूब विरूद्धच्या सामन्यात प्रेक्षकांच्या दिशेने थुंकणे, अंपायरला चहाड्या करणारा संबोधणे असे प्रकार केले. त्यानंतर त्याने पॉलला ३-६, ६-१, ६-७ (३), ७-५ असे हरवल्यानंतर देखील प्रेक्षकांना टोमणा मारला. तो म्हणाला की प्रेक्षक मला सारखे त्रास देत होते. तो सामन्यादरम्यान लाईन जजवरही भडकला होता.

किर्गियोसने सांगितले की, मला माहिती आहे की माझे वागणे प्रत्येकवेळी चांगले नसते. मात्र वर्णभेदी टिप्पणी कधीही स्विकारण्यात येणार नाही. ज्यावेळी मीनिक किर्गियोसने यापूर्वी स्टुटगार्ड ओपन टेनिस स्पर्धेत प्रेक्षकांकडून वर्णभेदी टिप्पणी झाल्याचा आरोप केला होता.

ज्यावेळी त्याने सेमी फायनलमध्ये अँडी मरेला पराभूत केले, त्यावेळी प्रेक्षकांनी त्याच्यावर वर्णभेदी टिप्पणी केली होती. किर्गियोसने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली की सामन्यादरम्यान प्रेक्षकांकडून अपमानजनक टिप्पणी करण्यात आली. हे सगळं कधी थांबणार आहे? असा प्रश्न देखील त्याने उपस्थित केला. प्रेक्षकांना प्रत्युत्तर देतो त्यावेळी मला दंड केला जातो. हे योग्य नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या