Thursday, September 28, 2023

फणस डोक्यात पडल्यामुळे रिक्षाचालकाला झाला कोरोना!

…पण या रिक्षाचालकाचा कोरोना विषाणूची लागण कशी झाली, याबाबत अद्याप स्पष्ट झालेलं नाही

केरळ : देशात कोरोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या फैलावामुळे लोकांमधील भीतीचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे. दरम्यान एका रिक्षाचालकाच्या डोक्यावर फणस पडून जखमी झाल्याची घटना केरळमध्ये कासरगोड जिल्ह्यात घडली आहे. त्यानंतर या रिक्षाचालकाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याल आले असून त्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. डॉक्टरांनी फणस डोक्यात पडून रिक्षाचालकाला गंभीर दुखापत झालेली असल्याचे सांगितले आहे. पण या रिक्षाचालकाचा कोरोना विषाणूची लागण कशी झाली, याबाबत अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Read More  विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 80 आरोग्य सेवकांची कोरोना तपासणी

परियारम मेडिकल कॉलेजचे अधीक्षक डॉ. के.सुदीप यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक हा झाडावरुन फणस काढत असताना त्यांच्या डोक्यावर एक फणस पडला. यामुळे त्याच्या मणक्याला, हाता-पायालाही दुखापत झालेली आहे. रिक्षाचालकाची दुखापत पाहता त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट झाले. शस्त्रक्रियेसाठी आलेल्या प्रत्येक रुग्णांची कोरोना चाचणी केली जाते. त्यामुळे त्यावेळेस त्याची कोरोनाची चाचणी केली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कासरगोडमधील बेलूर येथील राहणार हा रिक्षाचालक आहे.

पण हा रिक्षाचालक कोरोनाग्रस्तांचा संपर्कात आल्याची किंवा प्रवासाला गेल्याची माहिती मिळालेली नाही. तसंच रिक्षामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांमार्फत त्याला लागण झाली आहे का देखील अस्पष्ट आहे. पण त्याने एका रुग्णाला जिल्हा रुग्णालयात आणून सोडले होते. तरीही या रिक्षाचालकाला कोरोनाची लागण कशी झाली याचा अद्याप तपास सुरू आहे, अशी माहिती सुदीप यांनी दिली.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या