21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeराष्ट्रीयकोरोनाविरुद्धची लढाई एक जुटीने लढायला हवी

कोरोनाविरुद्धची लढाई एक जुटीने लढायला हवी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाविरोधी लढाई एक कठीण आव्हान आहे. अशा परिस्थिती सर्व पक्षांनी पक्षीय राजकारणाच्या वर येऊन मिळून लढली पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. कोरोनावरी व्यवस्थापनासंबंधी पंतप्रधान मोदींनी मंगळवारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय नेत्यांना हे आवाहन केले. या बैठकीत आरोग्य सचिवांनी लसीकरण मोहिमेवर एक प्रेजेंटेशन केले आणि सध्याच्या स्थितीबाबत विरोधी पक्षांना माहिती दिली.

लसीकरण मोहिमेत सुरवातीचे १० कोटी डोस देण्यास ८५ दिवस लागले. पण अखेरचे १० कोटी डोस देण्यासाठी फक्त २ दिवस लागले. ६ महिन्यांनंतरही अनेक आरोग्य कर्मचा-यांनी लस घेतलेली नाही, यावर चिंता व्यक्त करत पंतप्रधान मोदींनी लसीकरण मोहीम नियोजनबद्ध प्रकारे सुरू ठेवण्यावर भर दिला. पंतप्रधान मोदींनी कोरोनाच्या संकटात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आतापर्यंत २० वेळा बैठक केली आहे, तर आरोग्य मंत्र्यांनी २९ वेळा बैठका घेतल्या आहेत. फक्त ८ राज्यांमध्ये १०-१० हजारांहून अधिक कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, तर फक्त ५ राज्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर हा १० टक्क्यांहून अधिक आहे. जगात सर्वाधिक लसीकरण हे भारतात झाले आहे, अशी माहिती आरोग्य सचिवांनी प्रेजेंटेशनवेळी दिली.

पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी कौतुक केले. विविध पक्षांच्या नेत्यांनी आपला अनुभव बैठकीत मांडला, तर बीजेडीने लसीकरण मोहीम ९० टक्के राज्य सरकारांच्या नियंत्रणात देण्याची मागणी केली. अनेक पक्षांनी भारतात विकसित केलेल्या लसींना जागतिक स्तरावर मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. महाराष्ट्र आणि बंगालने लसीच्या डोसच्या कमतरतेचा मुद्दा उपस्थित केला.

मुंबईत १ ऑगस्टपासून घरोघरी लसीकरण!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या