37.8 C
Latur
Monday, May 29, 2023
Homeक्रिकेटमध्ये नव्या युगाची सुरुवात ?

क्रिकेटमध्ये नव्या युगाची सुरुवात ?

एकमत ऑनलाईन

कोरोना संकट : चेंडूवर थुंकी लावण्यास बंदीची शिफारस!

नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये चेंडूची चमक कायम राखण्यासाठी चेंडूवर थुंकी लावण्याची पद्धत आहे. मात्र आता लवकरच ही पद्धत बंद होण्याची शक्यता आहे. अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखालील आयसीसीच्या क्रिकेट समितीने कोरोनाच्या भीतीमुळे ही पद्धत बंद करण्याची शिफारस केली आहे. चेंडूची चमक कायम ठेवण्यासाठी घामाचा वापर करण्याबाबत मात्र कोणताही धोका दिसत नसल्याचे मत क्रिकेट समितीने व्यक्त केले आहे.

व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून क्रिकेट समितीची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत क्रिकेट मालिकेसाठी केवळ यजमान देशाचेच पंच अम्पायरिंग करण्याचा प्रस्ताव देखील ठेवण्यात आला. आतापर्यंत क्रिकेट मालिकेसाठी तटस्थ पंच किंवा दोन संघांच्या देशाचे पंच काम पाहात होते, पण आता यापुढे केवळ यजमान देशाचेच पंच अम्पायरिंग करताना दिसण्याची शक्यता आहे. याचसोबत प्रत्येक डावात गोलंदाजी आणि फलंदाजी करणा-या संघाला दोन-दोन डीआरएस रिव्ह्यूू देण्यात येतात, त्याची संख्या दोनवरून तीन करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

Read More  अमेरिकेत पहिली मानवी चाचणी यशस्वी!

डीआरएस संबंधित बदल
स्थानिक सामन्यांच्या अधिकाºयांची अल्प कालावधीसाठी नियुक्ती करण्यात यावी आणि प्रत्येक स्वरूपातील एका संघासाठी अतिरिक्त डीआरएस अपिलची तरतूद अंतरिम उपाय म्हणून करण्यात यावी, असे या शिफारशीत म्हटले गेले आहे. या शिफारसी व सूचना मंजूर करण्यासाठी समिती जूनच्या सुरुवातीला आयसीसीच्या मुख्य कार्यकारींना आपला अहवाल पाठवेल.

जलद गोलंदाजांचा विरोध
चेंडूला चमकावण्यासाठी थुंकीचा वापर केला जातो. विशेषत: लाल चेंडूवर थुंकीचा वापर स्व्ािंग करण्यासाठी मदत होते म्हणून केला जातो. चेंडूवर जर थुंकी लावण्यास बंदी घातली तर क्रिकेटमध्ये एका नव्या युगाची सुरुवात होईल, असे बोलले जाते. अर्थात यामुळे चेंडू आणि बॅट यांच्यातील लढत कशी होईल हे येणारा काळच सांगू शकेल. या कल्पनेला मायकल होल्डिंग आणि वकार युनूससारख्या माजी जलद गोलंदाजांनी विरोध केला, तर काहींनी त्याचे समर्थन केले आहे.

Read More  सोनाली कुलकर्णी चा दुबईत साखरपुडा!

सवय लावून घ्या: इशांत शर्मा
कोरोनानंतर क्रिकेटचे पुनरागमन झाल्यावर खेळाडूंना नवीन नियम अवलंबण्यास तयार राहावे लागेल. आयपीएलमधील फ्रेंचायझी दिल्ली कॅपिटल्सच्या इन्स्टाग्रामवर इशांत म्हणाला, लाळेचा वापर थांबवला तर आपण आपल्या इच्छेनुसार चेंडू चमकवू शकणार नाही. परंतु पर्याय नाही. तुम्हाला याची सवय लावावी लागेल. पण खरे सांगायचे तर मी या सर्व गोष्टींबद्दल जास्त विचार करत नाही. मला वाटते की दूरचा विचार करण्यापेक्षा सध्याचे जगणे आवश्यक आहे..

थुंकी ऐवजी घाम : कुंबळे
प्रत्येक क्रिकेट सामन्याशी संबंधित साºयांच्याच सुरक्षिततेची जबाबदारी लक्षात घेता हे प्रस्ताव पुढे करण्यात आले आहेत.आयसीसीच्या वैद्यकीय सल्लागार समितीचे प्रमुख डॉ. पीटर हारकोर्ट यांनी कोरोनाचा प्रसार लाळेवाटे किंवा थुंकीवाटे होण्याची शक्यता आहे अशी माहिती दिली. त्यामुळे क्रिकेट समितीतील सर्वांनी एकमताने चेंडूवर थुंकी लावण्याची पद्धत बंद करण्याची शिफारस केली आहे़.चेंडूवर घाम लावल्याने कोरोना संक्रमण किंवा प्रसाराचा कोणताही धोका नसल्याचेही वैद्यकीय समितीने सांगितले आहे. त्यामुळे गोलंदाज घामाचा वापर करून चेंडूची चमक कायम ठेवू शकतात’’, अशी माहिती अनिल कुंबळे यांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या