23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादीचा बडा नेता तुरुंगात जाणार

राष्ट्रवादीचा बडा नेता तुरुंगात जाणार

एकमत ऑनलाईन

भ्रष्टाचार उघड करणा, कंबोज यांचे ट्विट
मुंबई : राष्ट्रवादीचा एक बडा नेता नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यासोबत तुरुंगात जाणार. त्याचे नाव आपण पत्रकार परिषद घेऊन लवकरच उघड करणार असल्याचे भाजप नेते मोहित कंबोज यांनी सांगितले. या नेत्याच्या सिंचन घोटाळ््याची फाईल २०१९ साली बंद करण्यात आली होती, असे स्पष्ट संकेत मोहित कंबोज यांनी दिले.
राष्ट्रवादीच्या या नेत्याच्या बेनामी कंपन्या, त्यांच्या गर्लफ्रेंडच्या नावावर असलेली संपत्ती, भ्रष्टाचाराची माहिती आपण देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मोहित कंबोज यांनी एक ट्वीट करून ही माहिती दिली. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

मोहित कंबोज यांनी आज तीन ट्वीट केले आहेत. पहिल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, एनसीपीचा एक बडा नेता नवाब मलिक आणि अनिल देशमुखांप्रमाणे तुरुंगात जाणार आहे. दुस-या ट्वीटमध्ये मोहित कंबोज यांनी त्याबद्दल अधिक सूचक वक्तव्य केले आहे. ते म्हणतात की, राज्यातील सिंचन घोटाळ््याची पुन्हा चौकशी झाली पाहिजे. या घोटाळ््याची फाईल परमबीर सिंह यांच्या काळात २०१९ साली बंद करण्यात आली होती.

तिस-या ट्वीटमध्ये मोहित कंबोज यांनी थोडीशी सविस्तर माहिती देत आपली दिशा स्पष्ट केली. ते म्हणतात की, लवकरच आपण राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा पर्दाफाश करणार असून त्या नेत्याची भारतातील संपत्ती, देशाबाहेरील संपत्ती, बेनामी कंपन्या, त्याच्या गर्लफ्रेंडच्या नावावरील संपत्ती, त्याने मंत्रीपदावर असताना केलेला भ्रष्टाचार, त्याच्या कुटुंबाच्या संपत्तीची यादी याची माहिती देणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या