24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रपहिला फोन कुणी करायचा यावरूनच भाजप-शिवसेना युती खोळंबली ; केसरकरांचे मोठे...

पहिला फोन कुणी करायचा यावरूनच भाजप-शिवसेना युती खोळंबली ; केसरकरांचे मोठे वक्तव्य

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गटाने भाजपबरोबर सरकार बनवल्यानंतर आता शिवसेना-भाजप युती पुन्हा होऊ शकते. या युतीची चर्चा देखील सुरू झाली आहे. दोन्ही पक्षांची युती केवळ मानपानात अडकली आहे, अशी माहिती शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली आहे. पहिला फोन कुणी करायचा यावरूनच युती खोळंबली आहे असे केसरकर म्हणाले.

त्यामुळे अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्रिपदावरून फिस्कटलेली शिवसेना आणि भाजपची युती एका फोनने पुन्हा होऊ शकते, अशी शक्यता आहे.
केसरकर म्हणाले की, हा वाद आमच्यामध्ये नाही. आजही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतचे नाते तोडा, आम्ही ५० लोक माघारी येतो असे आम्ही सांगितले होते. पण त्यांनी आघाडी तोडली नाही. आता अनायसे आघाडी तुटली आहे. त्यावेळी तरी तुम्ही हा निर्णय घ्या.

आम्ही त्यावेळीही सांगितले होते की, भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आम्हाला एकट्याला निर्णय घेता येणार नाही. त्यावेळी तुम्हाला भाजपचाही विचार करावा लागेल, असेही केसरकर म्हणाले.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले की, आता शिवसेना-भाजप युती आहेच. एकनाथ शिंदे
आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार अजूनही शिवसेनेचेच आहेत. आम्ही तर शिंदे यांना रोजच फोन करतो. भाजप-शिवसेनेची युती आहेच.

त्यामुळे आमच्याकडून उद्धव ठाकरे यांना फोन जाण्याचा प्रश्नच नाही, असे ते म्हणाले. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना जबरदस्ती हात वर करून मुख्यमंत्री बनवले. भाजपने याआधी युती केलीच होती. त्यामुळे आमचा आता प्रश्नच उपस्थित होत नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या