24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयमेमध्येच यूपीत होणार होते स्फोट

मेमध्येच यूपीत होणार होते स्फोट

एकमत ऑनलाईन

लखनौ : अल कायदाच्या दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्याने उत्तर प्रदेशात होणा-या कारवाया टळल्या. अल कायदाचा दहशतवादी मिनहाज अहमदने त्याच्या म्होरक्यांच्या इशा-यावर मे महिन्यातच उत्तर प्रदेशची राजधानी लखनौसह अनेक शहरांमध्ये बॉम्ब स्फोट घडवणार होते. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात लॉकडाऊन लागू झाला. त्यामुळे दहशतवाद्यांना योजनेत बदल करावा लागला.

मिनहाज आणि त्याचे साथीदार स्फोट घडवून आणण्यासाठी गर्दी असलेल्या जागांचा शोध घेत होते. स्वातंत्र्य दिनाच्या जवळपास घातपात घडवून आणण्याची त्यांची योजना होती. त्यामुळे मिनहाज आणि मसीरुद्दीन यांनी घरातच कुकर बॉम्ब तयार करण्याचे काम सुरू केले. मिनहाज आधी लॅब तंत्रज्ञ म्हणून काम करायचा. त्याने जानेवारी २०१६ मध्ये नोकरी सोडली. त्यानंतर तो काकोरीतल्या त्याच्या घरातून दहशतवादाचा प्रचार-प्रसार करायचा. मिनहाजने इंटरनेटच्या माध्यमातून एक ग्रुप तयार केला. त्याने या माध्यमातून तरुणांना जोडण्याचे काम केले. यामध्ये कानपूरसह अन्य शहरांमधील काश्मिरींचादेखील समावेश होता.

लॉकडाऊन संपण्याची वाट पाहत होते
मिनहाज अहमद आणि मसीरुद्दीन यांनी त्यांच्या म्होरक्यांच्या आदेशावरून अनेक शहरांमध्ये घातपात घडवून आणण्याची संपूर्ण योजना आखली होती. मानवी बॉम्बच्या माध्यमातून योजना अंमलात आणली जाणार होती. त्यासाठी त्यांनी उन्नावमध्ये राहणा-या शाहिद आणि कानपूरच्या अनेक तरुणांना तयार केले होते़ मात्र मे महिन्यात राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढला. त्यामुळे सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊन लागू झाल्याने रस्त्यावरील, प्रमुख भागांमधील गर्दी कमी झाली. त्यामुळे मिनहाज आणि त्याचे साथीदार लॉकडाऊन संपण्याची वाट पाहत होते.

तिसरी लाट अटळ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या