प्रशासनाचा या भोंगळ कारभारामुळे दोन्ही कुटुंबाना नाहक मनस्ताप : मृतदेह मुलीचा असल्याची खातरजमा न करता अंत्यसंस्कार केले
मुंबई | तरुणीचा मृतदेह समजून एका तरुणाचा मृतदेह तिच्या नातेवाईकांना दिल्याची घटना समोर आली आहे. नवी मुंबई महापालिका आरोग्य प्रशासनाचा या भोंगळ कारभारामुळे दोन्ही कुटुंबाना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
महापालिका रुग्णालयाच्या शवागरातून 29 वर्षीय मोहम्मद उमर फारुख शेख याचा मृतदेह एका मृत तरुणीच्या नातेवाईकांना देण्यात आला. विशेष म्हणजे ज्या नातेवाईकांना उमर शेखचा मृतदेह देण्यात आला, त्या नातेवाईकांनी देखील ताब्यात घेतलेला मृतदेह मुलीचा असल्याची खातरजमा न करता अंत्यसंस्कार केले.
Read More शरद पवार यांनी राज्य सरकारला दिल्या 8 महत्त्वाच्या सूचना
मोहम्मद उमरचा मृतदेह समजून त्याच्या कुटुंबियांना एका मुलीचा मृतदेह देण्यात आला. ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी तो घेण्यास नकार दिला. त्यांनी मुलाचा मृतदेह आपल्या ताब्यात द्यावा, अशी मागणी केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी अन्य कारणांमुळे मृत पावणार्या व्यक्तींचीही सध्या कोविड तपासणी करण्यात येत आहे. रिपोर्ट येण्यासाठी काही दिवस लागत असल्यामुळे वाशी येथील महापालिका रुग्णालयातील शवागरात मृतदेहांची संख्या वाढली आहे.