23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeनातवंडांना शाळेत सोडायला जाताच चोरट्यांनी घर फोडले

नातवंडांना शाळेत सोडायला जाताच चोरट्यांनी घर फोडले

एकमत ऑनलाईन

मंगळवेढा :मंगळवेढा शहरालगतच्या रामकृष्णनगर येथे भरदिवसा चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेले सोन्याने दागिने व रोख रक्कम असा १ लाख ४८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. आजी नातवंडांना शाळेत सोडायला गेल्यानंतर चोरट्यांनी घर फोडले.

१६ जून रोजी ही घटना भरदिवसा घडल्यामुळे मंगळवेढा शहरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कुसुम सुभाष मोरे यांनी फिर्याद दिली आहे.

कुसूम या रामकृष्ण नगरमध्ये राहतात. त्या १६ जून रोजी सकाळी १० वा. नातवंडांना शाळेत सोडण्यासाठी गेल्या होत्या. त्यांचे पती सुभाष हे घराला कुलूप लावून देवदर्शनासाठी गेले होते.

 

फिर्यादी मुलांना शाळेत सोडून घरी परतल्यावर त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी मुलगा नितीन यास फोनवरून घटनेची हकिकत सांगितली. फिर्यादी व त्यांचा मुलगा, सून यांनी घरात डोकावले असता चोरी लक्षात आली. कपाटात ठेवलेले दोन तोळ्याचे सोन्याचे लॉकेट, अर्धा तोळ्याचे कानातील झुबे, अर्धा तोळ्याची पिळ्याची अंगठी, अडीच ग्रॅमच्या दोन लेडीज अंगठ्या, ३ ग्रॅमचे कानातील फुले, चांदीची वाटी पळविले.असे फिर्यादीत म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या