Thursday, September 28, 2023

आईसह दोन चिमुकल्यांचा अंत : कुत्र्याला वाचवण्याच्या नादात कार विहिरीत कोसळली

पुणे : पुण्यात कार विहिरीत पडल्याने आईसह  दोन चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात ही कार विहिरीत कोसळली. या दुर्घटनेत आई शितल कोतवाल, 9 वर्षीय मुलगी सृष्टी आणि 6 वर्षाच्या शौर्यचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर पती सचिन कोतवाल हे प्रसंगावधान राखल्यानेबचावले आहेत.

पुण्याच्या हवेली तालुक्यात अष्टपूर जवळ ही दुर्घटना घडली. मंगळवारी (9 जून) रात्री दहाच्या सुमारास कार विहिरीत कोसळली.कोतवाल दाम्पत्य हे राहूच्या सासरवाडीतून घरी येत होते. अष्टपूरजवळ मुख्य मार्गाऐवजी त्यांनी शॉर्टकटचा रस्ता निवडला. मात्र, हा घेतलेला शॉर्टकट आई आणि दोन चिमुकल्यांच्या जीवावर बेतला.

अष्टपूरजवळ साधारण आठ फुटीचा अरुंद रस्ता आहे. या रस्त्याला लागूनच पाण्याने काठोकाठ भरलेली विहीर आहे. या रस्त्यावर कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना कार विहिरीत कोसळली. या विहरीला कोणत्याही प्रकारचे संरक्षक कठडे नव्हते. त्यामुळे त्यामुळे कार थेट विहिरीत पडली. यावेळी सचिन कोतवाल प्रसंगावधान राखल्याने बचावले. त्यानंतर त्यांनी पत्नी आणि मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारच्या काचा बंद असल्याने त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला आणि पत्नीसह दोन चिमुरड्यांचा त्यांच्या डोळ्यादेखत मृत्यू झाला. यामुळे कोतवाल कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे

Read More  वाढदिवशीच झाला मृत्यू: ‘कोरोना’नं घेतला आमदाराचा बळी

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या