31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeउस्मानाबादमांजरा धरण शंभर टक्के भरले; ओव्हर फ्लो झाल्याने दोन दरवाजे...

मांजरा धरण शंभर टक्के भरले; ओव्हर फ्लो झाल्याने दोन दरवाजे उघडले

एकमत ऑनलाईन

कळंब (सतीश टोणगे ) : मांजरा धरण र 100% भरले आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार धरणक्षेञात मोठ्ठा पाऊस झाल्याने, धरण चे सोमवारी दोन दरवाजे उघडले आहेत..त्यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून मांजरा नदी काठावरील शेतकरी, ग्रामस्थांनी सतर्क रहावे. नदीपाञात पोहणे, नदीकाठावर जनावरे बांधणे किंवा चारण्यास नेणे टाळावे.

तसेच धरणाचे दरवाजे उघडल्यास ते पाहण्यासाठी जाणे, पाण्याच्या प्रवाहात उतरणे असे प्रकार नागरीकांनी करू नयेत. त्याचबरोबर एखाद्या पुलावरून पाणी वाहत असल्यास त्यातून वाहन नेणे, पूल ओलांडणे टाळावे. संभाव्य पाऊस, पूरपरीस्थिती लक्षात घेऊन आपण सतर्क रहावे, तसेच इतरांनाही सतर्क करावे.असे आवाहन लातुरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी,जी. श्रीकांत , कार्यकारी अभियंता एस.एस. आवटे उस्मानाबाद यांनी यांनी केले आहे.

मांजरा प्रकल्प
एकूण साठा 223…157 दलघमी
उपयुक्त साठा 176.027 दलघमी
पाणी पातळी 642.35 मी
एकूण साठा 100%

उपयुक्त साठा. 100%
प्रकल्पीय एकूण साठा 224.09 दलघमी
उपयुक्त साठा 176.96 दलघमी
मृत साठा. 47.130 दलघमी
पूर्ण संचय पातळी 642.37 मी

बेरोजगार दिव्यांगांच्या विद्रोही आंदोलनाने लक्ष वेधले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या