22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeकेंद्र सरकारने पीओपी गणेश मूर्तींवरील बंदी उठवली

केंद्र सरकारने पीओपी गणेश मूर्तींवरील बंदी उठवली

केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती - मूर्तीकारांना मोठा दिलासा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: वृत्तसंस्था
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर आॅफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींवर घातलेली बंदी केंद्र सरकारने एका वर्षासाठी उठवण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयामुळे मूर्तीकारांना मोठा दिलासा मिळाला आहे. गणेश मूर्तींसाठी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींवरील बंदीचा निर्णय एका वर्षासाठी स्थगित करण्यात येत असल्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जाहीर केला आहे. या गणेशोत्सवासाठी ज्यांनी पूर्वीच पीओपीच्या मूर्ती बनवल्या असतील अशा मूर्तीकारांचे या निर्णयामुळे नुकसान होणार नाही, असे प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.

Read More  आजारी वडिलांसह सायकलवरून १,२०० किमी प्रवास!

प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. खरे तर महाराष्ट्रातील प्रमुख सणांपैकी एक असलेल्या गणेशोत्सवासाठी गणेशमूर्ती निर्मितीचे काम काही महिन्यांपासून सुरू करण्यात येते. सरकारने प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला, तेव्हा राज्यात अर्ध्याहून अधिक मूर्ती तयार झालेल्या होत्या. या निर्णयामुळे असंख्या मूर्तीकारांचे मोठे नुकसान होणार होते. हाच विचार करून केंद्र सरकारने आपला निर्णय स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

ही बंदी घालताना केंद्र सरकारने मूर्ती घडवताना पर्यावरणाचा विचार करÞण्यात यावा, प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती बनवू नयेत आणि पर्यावरण पूरक अशा घटकांनीच मूर्ती तयार कराव्यात, तसेच रासायनिक रंगांचा वापर करू नये, अशा मार्गदर्शक सूचनाही केंद्र सरकारने जारी केल्या होत्या. गणेशोत्सवाला काहीच दिवस उरले असताना केंद्र सरकारने असा निर्णय जाहीर केल्यामुळे मूर्तीकारांपुढे मोठे आव्हान उभे राहिले होते. मात्र, ही बंदी उठवत केंद्र सरकारने मूर्तीकारांना मोठा दिलासा दिला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या