सुप्रीम कोर्टातील वकिलांचे चेंबर सुरू होणार

    296

    नवी दिल्ली: लॉकडाउनमुळे बंद असलेले सुप्रीम कोर्टाच्या आवारातील वकिलांचे चेंबर सम-विषम तारखांनुसार आलटूनपालटून सुरू करण्यात यावेत, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. २५ मार्चपासून लॉकडाउनच्या काळात व्हिडिओ कॉन्फरंिन्सगच्या माध्यमातून तातडीच्या खटल्यांची सुनावणी घेण्यात येत होती. २४ पासूनच सुप्रीम कोर्टाच्या आवारातील वकिलांचे चेंबर बंद करण्यात आले होते.

    Read More  माळेगाव कारखान्यात वायूगळती; १३ कामगार अत्यवस्थ

    सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन आणि सुप्रीम कोर्ट अ‍ॅडव्होकेट्स आॅन रेकॉर्ड असोसिएशन यांच्या सादरीकरणानंतर कोर्टाने वकिलांच्या चेंबरमधील प्रवेशांबाबत नवीन नियमावली करण्याचा निर्णय घेतला आहे. चेंबरमधील गर्दी टाळण्यासाठी आणि सुरक्षित वावराच्या नियमाचे पालन होण्यासाठी या दोन्ही संघटनांकडून एकत्रितपणे नवीन परिपत्रक काढले जाण्याची शक्यता आहे. चेंबरमधील कामकाज सोमवार ते शुक्रवार सकाळी १० ते ४ आणि शनिवारी सकाळी १० ते २ या वेळेत होण्याची शक्यता आहे. रविवारी पूर्णत: निर्जंतुकीकरणासाठी चेंबर पूर्णपणे बंद राहणार आहेत.