31.8 C
Latur
Saturday, April 1, 2023
Homeआधार कार्ड अपडेट आता मोफत होणार

आधार कार्ड अपडेट आता मोफत होणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधीच मोदी सरकारने सर्वसामान्यांना एक भेट दिली आहे. त्यानुसार ऑनलाइन आधार कार्ड अपडेट करणा-या यूजर्सला आता फुकटात अपडेट करता येवू शकते. पुढील तीन महिन्यांपर्यंत ऑनलाइन आधार अपडेट करणा-याला आता कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. याआधी यासाठी ५० रुपये चार्ज आकारला जात होता. परंतु आता आधार कार्ड अपडेट फ्री मध्ये होणार आहे.

ऑफलाइन किंवा केंद्रावर जावून तुम्ही आधार कार्ड अपडेट करू शकता. आधार कार्ड अपडेटसाठी ५० रुपये चार्ज आकारले जात होते. परंतु आता १५ मार्च २०२३ पासून १४ जून २०२३ पर्यंत हे फ्रीमध्ये करता येणार आहे. याचाच अर्थ १४ जून २०२३ पर्यंत या अपडेटसाठी कोणतेही चार्ज लागणार नाही.
आधार कार्ड जारी होवून जवळपास १० वर्षे झाली आहेत. या दरम्यान अनेक लोकांचा पत्ता, नाव बदलले आहेत. त्यामुळे सुरक्षेचे कारण पाहून यूआयडीएआय कडून सर्व आधार कार्डला अपडेट करण्याचा सल्ला दिला गेला आहे. आधार अपडेट ऑनलाइन वेग आणखी वेगवान करण्यासाठी मोदी सरकारकडून ५० रुपये फी तात्पुरती थांबवली आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या