शरद पवारांनीच दिली माहिती : राज्यपालांनी दोनवेळा आमंत्रण दिले होते. त्यामुळे मी त्यांना काल भेटायला गेलो
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी कोरोनाच्या कठीण काळात तुम्ही सगळे एकत्र काम करत आहात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील चांगलं काम करत आहेत, असं राज्यपाल शरद पवार यांना म्हणाले. दस्तुरखुद्द पवारांनीच ही माहिती दिली आहे.
राज्यपालांनी दोनवेळा आमंत्रण दिले होते. त्यामुळे मी त्यांना काल भेटायला गेलो. मी कृषीमंत्री असताना कोश्यारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते, असं पवारांनी सांगितलं तसंच राज्यपाल आणि आमच्यात जुन्या आठवणींवर देखील गप्पा झाल्याचं पवारांनी यावेळी सांगितलं. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत. कोरोना महामारीच्या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासंबंधी सगळी ताकद लावयचं हे सरकारचं उदिष्ट आहे. सरकार आणि प्रशसान त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत, असं पवार म्हणाले.
Read More WHO ने दिला इशारा : …कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जावे लागेल
दुसरीकडे शरद पवार यांनी काल मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली. मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पवारांच्यात कोरोनासंबंधी दीर्घ चर्चा झाली. मुंबई-पुणे-मालेगावला संख्या वाढते आहे यावरही विचारमंथन झालं तसंच उपाययोजनांवर देखील आम्ही बोललो, असं शरद पवार यांनी सांगितलं. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर मी मातोश्रीवर एकदाच गेलो होते. त्यानंतर मी गेलो नव्हतो. काल बाळासाहेबांच्या आठवणी जाग्या झाल्या. तसंच इतरही काल गप्पा झाल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.