17.5 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमहाराष्ट्र‘आव्हाड’प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

‘आव्हाड’प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

एकमत ऑनलाईन

मुंबई : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांनी हा निर्णय घेऊ नये, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.

रविवारी रात्री कळवा आणि ठाणे शहराला जोडणा-या कळवा-खाडी पुलाचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे.

अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, जेव्हा ही घटना घडली तेव्हा गाडीमध्ये मुख्यमंत्री बसलेले होते. त्यांच्यासमोर ही घटना घडली असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी भूमिका स्पष्ट करावी. कसे का होईना, पण तुम्ही मुख्यमंत्री झालेला आहात. या प्रकरणी स्पष्टता द्यावी, असे अजित पवार म्हणाले.

कायदा हातात घेऊन लोकप्रतिनिधीला बदनाम करण्याचे काम कोणी करत असेल तर ते दुर्दैव आहे. हा गुन्हा तातडीने मागे घेतला पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा (सिनेट) सदस्य सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे पॅनल कचेरीचे उद्घाटन आज झाले. त्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
जितेंद्र आव्हाड प्रकरणी पवार म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांचे ट्ीवट मी पाहिले. माझी त्यांना विनंती आहे की, त्यांनी अशा प्रकारे राजीनामा देऊ नये. त्यांनी राजकीय जीवनात खूप चढ-उतार पाहिले आहेत. अशा घटना घडत असतात.

कायद्याचा आदर केलाच पाहिजे. ज्येष्ठ नेते गाडीत बसण्यासाठी आधी आम्ही थांबतो मग आम्ही गाडीमध्ये बसतो. त्या व्हीडीओमध्ये आव्हाड हे एका भगिनीला बाजूला जायला सांगत आहेत त्यापेक्षा वेगळं काही नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वत: सांगायला पाहिजे की असे काही झाले नाही.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या