26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यसभेच्या निकालानंतर केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. आघाडी सरकार अल्पमतात आहे, त्यामुळे नैतिकता असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन बाजूला व्हावे, अशी मागणी नारायण राणेंनी केली आहे.

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली आहे. राणे म्हणाले, तीन सीट जिंकणार म्हणत होते. पण काय झालं? राऊतही एका मताने आले, काठावर आले. आमच्या हातातून आले.

आघाडीची मतं त्यांना मिळायला पाहिजे होती. सत्तेत आहात तुम्ही, सत्तेसाठी १४५ मतं लागतात. पण तुम्ही अल्पमतात आलाय. त्यामुळे नैतिकतेचं भान असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही राजीनामा द्या आणि बाजूला व्हा. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र दहा वर्षे मागे नेलाय. तुमचे आठ आमदार फुटतात, कुठेय तुमची विश्वासार्हता? तुमचे आमदार टिकवू शकत नाही आणि कसल्या बढाया मारताय?

राणे पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी जी प्रतिक्रिया दिली आहे, त्यातून बोध घ्या. चांगल्याला चांगलं म्हणणं माणुसकी धर्म आहे. कुणाबद्दल तरी चांगलं म्हणा. तशी तुमच्याकडून अपेक्षा नाहीये, कारण मला तुमचा स्वभाव माहीत आहे. तुम्ही सत्तेसाठी लायक नाही, असे म्हणणार नाही, पण तुम्ही मुख्यमंत्रिपदासाठी पात्र नाही.ŸŸŸŸŸŸŸŸŸŸŸ

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या