29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeमुख्यमंत्री गोंधळले; १०४ शाळांऐवजी शिक्षकांचा उल्लेख

मुख्यमंत्री गोंधळले; १०४ शाळांऐवजी शिक्षकांचा उल्लेख

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. कोस्टल रोडसंदर्भात अदित्य ठाकरेंनी लक्ष न दिल्यानं शिंदे गटात सामील होत असल्याची प्रतिक्रिया पदाधिका-यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांसाठी खास धनुष्यबाणाचा पुष्पगुच्छ कार्यकर्त्यांनी आणला होता. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी संबोधित केले. १०४ शाळांऐवजी, १०४ शिक्षकांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. पण त्यावेळी त्यांचा पुरता गोंधळ उडाला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले की, शिक्षक भरताचे भविष्य, तरुण पिढी घडवण्याचं काम करत असतो. आई-वडिलांच्या नंतर गुरुजनांचे स्थान असते. त्यामुळे दिवाळीनिमित्ताने आम्ही त्यांच्यासाठी निर्णय घेतला आहे. तसेच पुढे बोलताना सातव्या वेतन आयोगासह शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवणार असल्याचे आश्वासनही मुख्यमंर्त्यांनी एकनाथ शिंदेंना दिले आहे.

शिक्षकांना आश्वासन देताना मात्र मुख्यमंत्री चांगलेच गोंधळल्याचे पाहायला मिळाले. सातव्या वेतन आयोगासह सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देत असताना मुख्यमंत्री शिंदे यांची शाळा आणि शिक्षकांच्या संख्येत गफलत झाली. १०४ शाळांऐवजी, १०४ शिक्षकांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला.

तेवढ्यात मंचाखाली उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी शिक्षक नाही, तर १०४ शाळा असल्याची आठवण मुख्यमंर्त्यांना करुन दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्यांना विचारुन आपली चूक सुधारली आणि उपस्थितांशी संवाद पुढे सुरु ठेवला. त्यानंतर आता मी सविस्तर बोलत नाही, तर आपण एक बैठक घेऊ आणि त्यानंतर सर्व काही ठरवू असं मुख्यमंर्त्यांनी उपस्थितांना सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या