22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री चिठ्ठ्या वाचून बोलत होते

मुख्यमंत्री चिठ्ठ्या वाचून बोलत होते

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सोमवारी औरंगाबादच्या पैठणमध्ये भव्य सभा पार पडली. या सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे पिता-पुत्रावर टीकास्त्र सोडत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. दरम्यान, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री चिठ्ठ्या वाचून बोलत होते, असा आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैठणमधील फक्त २५ टक्के लोक होते.

सभेत गर्दी जमवण्यासाठी पैसे देऊन बाहेरून लोक आणले होते. या सभेला महिलांना ३०० रुपये आणि पुरुषांना ५०० रुपये देऊन गर्दी केलेली होती. ही पैसे देऊन गोळा केलेली सभा होती. मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यात कुठेही तथ्य नव्हते. मुख्यमंत्री चिठ्ठ्या वाचून बोलत होते, असा आरोप खैरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर केला आहे.

तसेच, बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे चालला आहात तर बाळासाहेबांनी शेवटी आदेश दिला होता की, माझ्या उद्धव आणि आदित्य यांना सांभाळा. मग हे त्यांनाच सोडून का चालले आहेत?, असा सवालही उपस्थित करण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात तुफान गर्दीत सभा झाली. या सभेत मुख्यमंत्र्यांनी शिवसेना नेतृत्वावर जोरदार टीका केली. त्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या