22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको; मुख्यमंत्री शिंदेंचे पोलिसांना आदेश

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको; मुख्यमंत्री शिंदेंचे पोलिसांना आदेश

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको, असा आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला आहे. ताफ्यासाठी लागू केलेल्या विशेष प्रोटोकॉलमुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन त्यांना त्रास सहन करावा लागतो असे म्हणत त्यांनी पोलिस आयुक्त आणि पोलिस महासंचालकांना यासंदर्भात आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल असतो. यावेळी रस्त्यावरील संपूर्ण वाहतूक थांबवली जाते. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यामुळे सामान्यांना त्रास सहन करावा लागत होता. मुख्यमंत्र्यांचा ताफा कुठेही गेला तरी स्पेशल प्रोटोकॉल लागू केला जातो पण वाहतुकीचा खेळखंडोबा नको म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांनी पोलिस महासंचालक आणि मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी पत्रव्यवहार करत प्रोटोकॉल काढून टाकण्यासंदर्भात चर्चा केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या