22.1 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeराष्ट्रीयधाडसी खेळाचे प्रदर्शन करणा-या सर्कशीला घरघर!

धाडसी खेळाचे प्रदर्शन करणा-या सर्कशीला घरघर!

एकमत ऑनलाईन

देशातील सर्कस होणार आता इतिहासजमा, वाढीव खर्चाचे आव्हान
मुंबई : एकेकाळी गर्दी खेचणारा खेळ म्हणून सर्कसकडे पाहिले जायचे. परंतु आता सर्कसीला घरघर लागली असून, आता हे सर्कसीचे प्रयोग आता हळूहळू बंद होत आहेत. यामुळे संपूर्ण सर्कसच आता बंद होण्याच्या उंबरठ्यावर येऊन थांबली आहे. त्यामुळे येणा-या काळात सर्कसीचा खेळ कालबा होतो की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.

सर्कस म्हटले की डोळ््यासमोर धाडसी खेळाचे प्रयोग उभे राहतात. सर्कसमधील जोकरच्या करामती, लहान मोठ्यांचे मनोरंजन करणारी हीच सर्कस आता शेवटच्या घटका मोजत आहे. कारण सर्कशीला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी मिळत आहे. त्यामुळे कलाकारदेखील सर्कशीकडे पाठ फिरविताना दिसत आहेत. या कारणांमुळे सर्कस मालकांना सर्कसच बंद करण्याची वेळ आली आहे.

पूर्वी देशभरात ४०० च्या वर सर्कस वेगवेगळया भागांत आपले प्रयोग दाखवायचे आणि याच सर्कशीमध्ये पुढे बाल कलाकार आणि प्राण्यांच्या प्रयोगावर बंदी घातल्याने सर्कशीला हळूहळू वाईट दिवस सुरू झाले. ज्या सर्कशीचे शो दिवस-रात्र हाऊसफुल असायचे, तेथे आता रिकाम्या खुर्च्या पाहायला मिळत आहेत.

आता सर्कस चालवायचा म्हटले की सर्कस मालकाला एका दिवसाला ४० ते ४५ हजार रुपयांचा खर्च लागतो. कारण यात ५० ते ६० कलाकार काम करत असतात. या सर्व कलाकारांची राहण्याची आणि जेवणाची सोय सर्कस मालकालाच करावी लागते. त्यामुळे सर्कसमध्ये दाखवलेल्या प्रयोगांमधून पूर्वीसारखे पैसे मिळत नसल्याचे कलाकार सांगतात.

राज्यात सध्या चारच सर्कस शिल्लक
कोरोना काळात सलग दोन वर्षे सर्कसचे प्रयोग बंद होते. त्यामुळे महाराष्ट्रच नाही तर देशभरातील अनेक सर्कस मालकांना भंगारमध्ये विकाव्या लागल्या. आता महाराष्ट्रात सध्या ४ सर्कस शिल्लक राहिल्या असून त्यांनादेखील प्रेक्षकांचा मिळणारा कमी प्रतिसाद हे पाहून या सर्कशी आता इतिहासजमा होणार का याची चिंता सर्कस मालक व्यक्त करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या