20.9 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeनांदेडनांदेड शहर पुन्हा गोळीबाराने हादरले

नांदेड शहर पुन्हा गोळीबाराने हादरले

एकमत ऑनलाईन

नांदेड : नांदेड शहर पुर्वी तलवारीचे शहर म्हणून ओळखल्या जात होते. परंतु गेल्या काही दिवसापासून सातत्याने शहरात खुलेआम बंदुकीचा सर्रास वापर होत असल्याचे उघड झाले आहे. दोन दिवसापुर्वी एक पिस्टलसह काही जीवंत काडतूस पकडण्यात आले. त्यापुर्वी अनेक बंदुकी आणि पिस्टल आरोपीकडून हस्तगत करण्यात आले. अध्यापही पोलिसांना हे कुठून आले याचा शोध घेता आले नाही.

एकामागून एक घटना शहरात घडत आहेत. मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास गाडीपुरा भागातील रेणुका माता मंदिराजवळ काहीजणांनी विक्की ठाकूर नावाच्या इसमास गोळ्या घालून ठार केले. यानंतर आरोपी फरार झाले आहेत. ही माहिती मिळताच पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल होवून आरोपीचा शोध सुरु केला आहे.

यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, मंगळवारी सायंकाळी गाडीपुरा भागातील रेणुकामाता मंदिर परिसरात दोन गुंडामध्ये चकमक झाली. यामध्ये एका गुंडाच्या दुस-या गुंडाच्या टोळीने गोळीबार करुन जागीच ठार केल्यामुळे या परिसरात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. मागील काही दिवसात नांदेड शहर परिसरात गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. नागरिकांसह व्यापा-यांना भररस्त्यात लुटण्याच्या घटना सहज घडत आहेत. काही दिवसापुर्वी नवामोंढा भागातील व्यापारी आणि जानापुरी- सोनखेड रस्त्यावर एका पेट्रोलपंपच्या व्यवस्थापकाकडील लाखो रुपयांची रक्कम लुटण्यात आली होती तर एका बचत गटाच्या व्यवस्थापकावर गावठी पिस्तूलातून पैसे लुटण्यासाठी गोळीबार झाला होता.

गुन्हा शाखेने व्यापारी व पेट्रोलपंपाच्या व्यवस्थापकास लुटणा-या आरोपींना गजाआड केले होते. परंतु यानंतर पुन्हा शहरात गंभीर गुन्ह्याची मालिका सुरु होण्याची शक्यता आहे. मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास शहरातील गाडीपुरा भागातील रेणुकामाता मंदिर परिसरात काहीजणांनी विक्की ठाकूर नामक इसमावर गोळीबार केला. यात ठाकूर जागीच ठार झाला. या घटनेच्या ठिकाणी तलवारीचा देखील उपयोग करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. जवळपास २ गोळ्या विक्की ठाकूर याच्या छातीत घालण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आरोपींनी गोळीबार करुन घटनास्थळावरुन पोबारा केला. सदरील घटना प्रत्यक्ष पाहणा-यांनी वर्णन करत सांगितले की, सिनेस्टाईल घटना घडली आहे. दोन्हीकडील गुंड टोळी असून आपसी वादातून ही गोळीबाराची घटना घडली असे बोलल्या जात आहे.

दुस-या लाटेत ऑक्सिजनअभावी एकाचाही बळी नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या