24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeमहाराष्ट्रवर्ल्ड कप टी-२० चे समालोचन आता मराठीत होणार

वर्ल्ड कप टी-२० चे समालोचन आता मराठीत होणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्र आणि मराठी भाषा हे समीकरण गेली अनेक वर्षे जपणा-या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता पुन्हा एकदा आपला मनसे इम्पॅक्ट दाखवला आहे. नुकतीच आयपीएल २०२१ संपली आणि याचे समालोचन इतर भाषांसोबत मराठीत व्हावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक यांनी ‘हॉटस्टार’सोबत पत्रव्यवहार करत आयपीएलचे समालोचन मराठीत करावे याची मागणी धरून ठेवली होती. त्यानंतर ‘हॉटस्टार’ने आता झालेल्या सामन्यांचे समालोचन मराठीत केले.

यानंतर वर्ल्ड कपचे समालोचन मराठीत व्हावे अशी मागणी केली होती. मात्र, ‘हॉटस्टार’ने या वर्षी ही मागणी पूर्ण होऊ शकणार नसल्याची माहिती ट्विट करत दिली होती. मात्र, एकदा का मनसेच्या हाती कोणता विषय गेला आणि तो मराठी भाषेसाठी असेल तर मनसे ती कामगिरी फत्ते केल्याशिवाय राहात नाहीच. आणि त्यामुळे ‘हॉटस्टार’ने आता सुरू होणारी वर्ल्ड कप मॅच आणि त्याचे समालोचन मराठीत करणार असल्याची माहिती ट्विट करत दिली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यापासून वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे आणि याच सामन्यापासून मराठीतून समालोचन होणार आहे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या