22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeसरकारी रुग्णालयाची अवस्था अंधार कोठडीपेक्षाही भयंकर!

सरकारी रुग्णालयाची अवस्था अंधार कोठडीपेक्षाही भयंकर!

- गुजरात सरकारला उच्च न्यायालयाने घेतले फैलावर

एकमत ऑनलाईन

सुरत: वृत्तसंस्था
करोनामुळे गुजरातमधील परिस्थितीही चिंताजनक आहे. गुजरातमध्ये कोरोनाचा मृत्यूदर काळजी वाढवणारा असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून होत आहे. कृत्रिम नियंत्रणाच्या प्रयत्नावरून गुजरात उच्च न्यायालयाने रुपाणी सरकारला फैलावर घेत कान उपटले. अहमदाबादमधील शासकीय रुग्णालयातील परिस्थितीवरून न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावले. सरकारी रुग्णालय एखाद्या अंधार कोठडीसारखे आहे. त्यापेक्षाही भयानक स्थिती आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

अहमदाबादमध्ये कोरोनावर उपचार करणारं मुख्य शासकीय रुग्णालय आहे. या रुग्णालयात आतापर्यंत ३७७ रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यातील एकून मृत रुग्णांच्या तुलनेत रुग्णालयातील मृतांचे प्रमाण ४५ टक्के इतके आहे. राज्यातील कोरोना नियंत्रणाबरोबर रुग्णांना उपचार मिळण्याविषयी गुजरात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकावर न्यायमूर्ती जे. बी. परदीवाला आणि इलेश व्होरा यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली.

Read More  लॉकडाऊनमध्ये मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले 19 हजार 100 कोटी रूपये !

या याचिकांवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने गुजरातमधील कोरोना परिस्थितीची तुलना बुडणा-या टायटॅनिक जहाजाशी केली. त्याचबरोबर कोरोना नियंत्रणासाठी आणि रुग्णालयातील उपचारात सुधारणा करण्यासंदर्भात न्यायालयाने राज्य सरकारला निर्देश दिले. ही गोष्ट अत्यंत वेदनादायी आणि त्रासदायक आहे की, आजच्या घडीला सरकारी रुग्णालयातील परिस्थिती खूप दयनीय आहे. अहमदाबादमधील शासकीय रुग्णालयातील सोयी सुविधा अत्यंत निकृष्ट असल्याचे दिसून आले आहे. त्याबद्दल न्यायालयाला वाईट वाटत आहे. सरकारी रुग्णालय म्हणजे रुग्णांवर उपचार करणे, असे काही दिवसांपूर्वी न्यायालयाने म्हटले होते़ पण, आज असे दिसत आहे, की सरकारी रुग्णालय अंधारकोठडीसारखंच आहे. कदाचित अंधारकोठडीपेक्षाही वाईट, अशा शब्दात न्यायालयाने गुजरात सरकारला फटकारले़

रुग्णांना येत असलेल्या अडचणींची आरोग्यमंत्र्यांना कल्पना आहे का?
सरकारी रुग्णालयातील आरोग्य सेवेत सुधारणा करुन रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळावेत, यासाठी उच्च न्यायालयाने गुजरातचे अतिरिक्त सचिव पंकज कुमार, सचिव मिलिंद तोरवणे व आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या प्रधान सचिव जयंती रवि यांची अहमदाबादमधील सरकारी रुग्णालयाचे प्रभारी म्हणून नियुक्त केली. त्याचबरोबर सरकारी रुग्णालयात रुग्णांना भेडसावणाºया समस्यांची आरोग्यमंत्री नितीन पटेल व मुख्य सचिव अनिल मुकीम यांना कल्पना आहे का?, असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या