हिमायतनगर : तालुक्यात काल दि ८ जुलै पासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक गावांमध्ये पाऊसाचे पाणी शिरल्याने अनेकांच्या घरांमध्ये पाणी जाऊन जन जीवन विस्कळीत झाले असल्याचे पहायला मिळत आहे तर शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असल्याचे पहायला मिळत आहे तर तालुक्यातील पळसपुर ते डोल्हारी या गावचा संपर्क तुटल्याने जन जिवन विस्कळीत झाले आहे.
त्यामुळे असंख्य नागरिक आपला जीव मुठीत धरून या मुसळधार पाऊसा पासून आपले सोरक्षण करण्यासाठी सुरक्षित ठिकाणी सहारा घेत आहेत तर या पूर सदृष्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी हिमायतनगरचे तहसिलदार हे नेहमी नॉट रीचेबल राहत आहे. त्यामुळे हिमायतनगर येथील महसूलचे तलाठी सोडले तर इतर ठिकाणचे कर्मचारी हे नांदेड सारख्या ठिकाणी सुरक्षित राहून काही कर्मचारी उंटावर शेळ्या हाकलत आहेत व ह्या पासिरस्थितीची पाहत करत आहेत त्यामुळे ह्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यावर येथील नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला आल्याचे पहायला मिळत आहे
तालुक्यातील पळसपुर ते डोलारी या गावचा संपर्क तुटला व पवना-आंदेगाव , महादापुर ते सवणा,पांघरी ते खैरगाव या गावांना देखील पुराच्या पाण्याने वेढले आहे त्यामुळे अनेक गावचा संपर्क तुटला असल्याचे तालुक्यात बोलल्या जात आहे व अनेक छोट्या मोठ्या नद्यांना पूर आला असल्याने अनेक गावचा विद्युत पुरवठा महावितरण करून खंडित करण्यात आला असून मोबाईल नेटवर सुद्धा गायब झाले आहे व शेतातील पिकांचे खुप मोठे नुकसान झाले असल्याचे पहायला मिळत आहे त्यामुळे काल दि ८ जुलैच्या रात्रीपासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी पुर परिस्थिती निर्माण झाली आहे ह्याचा आढावा घेण्यासाठी शहरातील एक तलाठी सोडले तर तालुक्यातील इतर कुठलाच अधिकारी घटना स्थळी उपस्थित नसल्याचे दिसून येत आहे! त्यामुळे अनेक गावच्या नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले असल्याचे पहायला मिळत आहे.