शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या संचारबंदीत जमावबंदी असल्यामुळे धुमधडाक्यात होणारे लग्न अंत्यत साध्या पद्धतीने साजरे होऊ लागल्याने सर्व सामान्य कुटूंबे सुखावली आहेत़ मोठ्या लग्नाला प्रशासनाने ब्रेक लावल्याने लग्नात होणारा गाजावाजा थांबला असून लग्नातील अनावश्यक गाजावाजा करण्याला फाटा बसला आहे. आदर्श विवाह सोहळ्यांला कोरोनामुळे प्रारंभ झाला असून येणाºया काळात असे विवाह झाल्यास वधू पित्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गेल्या अनेक वर्षापासून धर्मगुरू, प्रबोधनकार व सामाजिक कार्यकर्ते लग्न समारंभातील बडेजाव रोखण्यासाठी व लग्न समारंभ अत्यंत साध्या पद्धतीने करण्यासाठी प्रयत्न केले. यांसाठी मोठे प्रयत्न करूनही त्यात त्यांना यश आले नव्हते. मात्र, या वर्षीच्या ऐन लग्नसराईत कोरोनामुळे यश आले आहे. लॉकडाऊन पूर्वी नियोजन केलेले अनेक लग्न समारंभ सध्या कसलाही बडेजाव न करता घरी किंवा शेतात अत्यंत तुरळक व्यक्तींच्या उपस्थितीत अगदी साध्या पद्धतीने पार पडत आहेत. ग्रामीण भागात राहून ही लग्नासाठी मंगल कार्यालय ठरविलेले अनेक लग्न गावात परत आले असून काही जण घरी तर काही जण शेतातून लग्न पार पाडत आहेत.
Read More नांदेडकरांना बुधवारी कोरोनापासून दिलासा
लग्न समारंभ हा जीवनातील सर्वांत आनंदाचा क्षण मानला जातो. यात कोणतीही कसर न ठेवता मोठ्या धुमधडाक्यात लग्न करण्याची शर्यत लागलेली.मोठ मोठे मंडप, साऊंड सिस्टिम, बँड, व्हीडीओ शुटींग, फटाक्यांची आतिशबाजी,हारे -तुरे,मान सन्मान, मोठ्या जेवणावळी व त्यानंतर वरात काढून आनंद व्यक्त करीत.त्यामुळे अशा अनावश्यक गोष्टी साठी लाखो रुपयांचा चुराडा व्हायचा. त्याला लागणारा पैसा उपलब्ध करण्यासाठी उसणवारी, सावकाराकडून कर्ज तर प्रसंगी अनेकांना शेत जमिनी व घरे ही विकावी लागली. लग्नातील अल्प आनंदाचा क्षण सोडला तर त्यांना कायम कर्जबाजारी होऊन राहावे लागत असल्याने लग्नातील अनावश्यक खर्चामुळे अनेक कुटूंबे उद्ध्वस्त झाली. असे घडूनही फक्त मोठेपणाच्या हव्यासापोटी ही परंपरा कायम राहिली होती, पण या बडेजावपोटी मोठी लग्न करणाºयाला कोरोनामुळे चाप बसला आहे.जे काम धर्मगुरू, प्रबोधनकार व सामाजिक कार्यकर्ते यांना प्रचंड मेहनत घेऊन साध्य करता आले नाही ते कोरोनामुळे साध्य झाले असून कोरोना सर्वसामान्य कुटूंबाच्या मदतीला धावून आला असेच म्हणावे लागेल.
वधू पित्यांची कसरत टळू लागली
लग्न सोहळा हा संस्मरणीय करण्यासाठी दोन्ही मंडळीकडून लवाजमा गोळा करून मोठा खर्च केला जातो. रितीरिवाजाची आड घेऊन अनेक अनावश्यक खर्च केले जात असत. त्यात प्रामुख्याने वधू- पित्याला लग्न समारंभासाठी मोठी आर्थिक कसरत करावी लागत होती. तरी पण मान सन्मानाच्या नावाखाली रुसवा फुगवा ठरलेला असायचा. मात्र, या कोरोनाच्या जमाबंदीच्या पार्श्वभूमीवर या अनावश्यकपणा थांबल्या असून मोठी लग्न समारंभ थांबून सध्या घरी ंिकवा शेतात दहा विस माणसांच्या उपस्थितीत लग्न होत आहेत. यांमुळे सर्वसामान्य कुटूंबाला दिलासा मिळाला असून या कोरोनामुळे आदर्श विवाह सोहळ्यांचा प्रारंभ झाला आहे.