22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeराष्ट्रीयदेशात युद्धपातळीवर रेमडेसिवीरचे उत्पादन सुरु; दररोज तयार होणार ३ लाख डोस

देशात युद्धपातळीवर रेमडेसिवीरचे उत्पादन सुरु; दररोज तयार होणार ३ लाख डोस

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशभरातील कोरोनाच्या उद्रेकामुळे कोविडच्या रुग्णांवर उपचारांसाठी प्रभावी ठरलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक हतबल झाले आहेत. यापार्श्वभूमीवर या इंजेक्शनचे उत्पादन वाढवण्याच्या सूचना केंद्र सरकारने संबंधित फार्मा कंपन्यांन्या केल्या आहेत. त्यानुसार याचे उत्पादन सुरु झाले असून, पुढील पंधरा दिवसात दररोज ३ लाख रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा खुल्या बाजारात पुरवठा केला जाईल, असे केंद्रीय रसायन आणि खते मंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितले आहे. सध्या दरदिवशी दीड लाख इंजेक्शनचे उत्पादन केले जात आहे.

मांडवीय म्हणाले, अँटी व्हायरल औषध असलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर याच्या किंमतही कमी करण्याच्या सूचना कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. आजपासून दररोज दीड लाख रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे डोस तयार करण्यास सुरुवात झाली आहे. पुढील पंधरा दिवसात हे उत्पादन दुप्पट केले जाईल. त्यानुसार दररोज ३ लाख डोस बाजारात उपलब्ध करुन दिले जातील. देशात सध्या रेमडेसिव्हीर बनवणारे २० प्रकल्प कार्यरत आहेत. यामध्ये आणखी २० प्रकल्प सुरु करण्यास भारत सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. येत्या काळात रेमडेसिवीरचा अधिकाधिक पुरवठा व्हावा यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे, असेही मांडवीय यांनी म्हटले आहे.

स्वेच्छेने केल्या किमती कमी
सरकारच्या आवाहनानंतर शनिवारी अनेक फार्मा कंपन्यांनी स्वेच्छेने रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किंमती कमी केल्या. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याने त्याची तिप्पट किंमतीत काळ्याबाजारात विक्री केली जात होती.

देशभरात १६२ ऑक्सिजन प्लांट उभारण्यास मंजूरी!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या