कोल्हापूर : स्वातंत्र्याचा ७५ वा अमृतमहोत्सव आपण साजरा करत आहोत, पण देशाची वाटचाल लोकशाहीतून हुकूमशाहीकडे चालली आहे का, अशी शंका येते. विरोधकांनी बोलूच नये. आम्ही जे करतो ते होय म्हणावे अशा पद्धतीचा प्रयत्न सुरू असल्याची टीका पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे. त्यांनी कोल्हापूरमध्ये मोदी सरकारवर चांगलाच हल्ला चढवला.
पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांवर अशा पद्धतीची कारवाई करून या देशातील कुठल्याही विरोधी पक्षाने बोलू नये, किंबहुना येणारी राष्ट्रपतीची निवडणूक आहे, त्यामध्ये काही होऊ नये यासाठी या सगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत. तरी मला वाटते सुडाचे राजकारण फार दिवस या देशांमध्ये चालेल असं मला वाटत नाही, असेही ते म्हणाले.
लोकशाहीबद्दल अनेकांना शंका वाटते
जगाच्या पाठीवर भारताची लोकशाही प्रबळ आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेवर चाललेली आहे. परंतु, आज या लोकशाहीमध्ये नेमकं काय चाललंय, लोकशाहीचा आदर्श घेत होते आज त्यांना ही शंका वाटते की या लोकशाहीमध्ये असे घडू शकते? हे आपल्या दृष्टीने देखील वाईट आहे, असे पाटील यांनी सांगितले.